ओटीटी प्लॅटफॉर्मने चित्रपट व वेबसीरिज पाहण्याच्या अनुभवात अनेक बदल घडवून आणले आहेत. डिस्नी प्लस हॉटस्टार, अॅमेझोन प्राइम, जिओ सिनेमा, प्राइम व्हिडिओ आणि यांसारख्या अनेक ओटीटी माध्यमांवर दर आठवड्याला नवीन कलाकृती प्रदर्शित होत असतात. तुम्हीही अशा रंजक चित्रपट व वेबसीरिजच्या शोधात असाल तर जाणून घ्या, या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट व सीरिजची यादी.
अवतार द लास्ट एअरवेंडर : ‘अवतार द लास्ट एअरवेंडर’मध्ये जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा जगातील चार राष्ट्रांभोवती केंद्रित आहे, जे अतिशय प्रेमाने जगले. पण, फायरनेशन हल्ल्यानंतर सर्व काही बदलते आणि फायरबेंडर्स जग जिंकण्यासाठी निघतात अशी या सीरिजची कथा आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.
मलाइकोट्टई वालीबान : ‘मलाईकोट्टाई वालीवान’ एका दिग्गज माणसाच्या जीवनाभोवती फिरते कारण तो आपल्या संघर्ष आणि यशाने पुढच्या पिढीसाठी मार्ग तयार करतो. या चित्रपटात मोहनलाल, सोनाली कुलकर्णी, हरीश पेराडी, मनोज मोसेस, कथा नंदी, दानिश सेत आणि मणिकंदन आचारी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर येत्या २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
पोचर : पोचर ही सत्य घटनांवर आधारित एक सीरिज आहे. केरळमध्ये ९०च्या दशकाच्या सुरुवातीस हत्तींच्या निर्दयी हत्यांची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. हिंदी, मल्याळम व इंग्रजी या तीन भाषांमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.
‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : २०१२ सालच्या शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी यांची नावे चर्चेत आली होती. यावर ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ’ ही डॉक्युमेंट्री सीरिज बनवण्यात आली आहे. ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ’ या सीरिजद्वारे कथेच्या दोन्ही बाजूंची अनेक रहस्ये उलगडणार असल्याचे म्हटले जात आहे. येत्या २३ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.” असं म्हटलं आहे. ही सीरिज इंग्रजी, हिंदी, तमिळ व तेलुगू अशा चार भाषांत प्रदर्शित होणार आहे.