शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“विलासरावांना जाऊन…”, स्टेजवर वडिलांबाबत बोलताना ढसाढसा रडू लागला रितेश देशमुख, आईलाही अश्रु अनावर अन्…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 19, 2024 | 11:50 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actor Riteish deshmukh got emotional while speaking on father vilasrao deshmukh

“विलासरावांना जाऊन...”, स्टेजवर वडिलांबाबत बोलताना ढसाढसा रडू लागला रितेश देशमुख, आईलाही अश्रु अनावर अन्...

बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने छाप पाडलेला अभिनेता म्हणजे रितेश विलासराव देशमुख. रितेश देशमुख हा स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आहे. रितेशने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नसला तरीदेखील त्यांचे दोन्ही भाऊ अमित व धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय आहेत. विलासराव देशमुख यांचे निधन होऊन आज इतकी वर्षे झाली असली तरीदेखील त्यांच्या आठवणीत त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हळहळतो आणि आज त्यांचा मुलगा रितेशही वडिलांच्या आठवणीत हळहळला.

लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी वडील विलासराव व त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या संबंधाबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भावूक झाला.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

यावेळी वडील विलासराव व दिलीपराव या दोन भावांच्या नातेसंबंधाबद्दल बोलत असताना रितेशला अश्रु अनावर झाले. त्यांच्याविषयी बोलताना त्याने असं म्हटलं की, “विलासराव आणि दिलीपराव यांनी भाऊ म्हणून एकमेकांना जपलं. या दोन भावांनी एकमेकांपासून आपल्याला काय मिळेल? याचा कधीच विचार केला नाही”.

आणखी वाचा – ‘आजी सोनियाचा दिनु’ संदीप पाठक आजीला भेटायला पोहोचला उद्गीरमध्ये, सोशल मीडियावर भेटीचा खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

यापुढे रितेशने “आपल्या भावाला आपण कशी साथ देऊ शकतो, हाच संदेश विलासराव व दिलीपराव यांनी दिला. आज विलासराव यांना जाऊन जवळपास १२ वर्ष झाली…”, असं म्हणत असतानाच असे रितेशला गहिवरून आले आणि रितेश देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.

आणखी वाचा – Video : ‘तेरी मेरी यारियां!’ पूजा सावंतच्या साखरपुड्यात मित्र-मैत्रिणींची मज्जा-मस्ती, प्रार्थना बेहेरेने शेअर केले खास क्षण

यावेळी त्यांना सावरण्यासाठी भाऊ अमित देशमुख पुढे आले आणि त्यांनी रितेश यांना सावरले. यानंतर काही वेळ थांबून रितेश देशमुख यांनी पुन्हा भाषण सुरू करत “आम्हाला वडिलांची उणीव भासू नये म्हणून काका नेहमीच मागे उभे राहिले” असंही म्हटलं.

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsriteish deshmukhvilasrao deshmukhमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजनरितेश देशमुखविलासराव देशमुख
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Sai Lokur met Megha Dhade Sharmistha Raut after one and a half years also she shared this special video on social media

‘ही दोस्ती तुटायची नाय!’, तब्बल दीड वर्षांनी सईने घेतली जिवलग मैत्रिणींची भेट, खास व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.