जिवलग मित्र किंवा मैत्रिणीचे लग्न म्हटलं की धमाल मजा मस्ती ही आलीच. अनेकजण आपल्या खास मित्र-मैत्रिणींच्या लग्नासाठी खूपच आतुर असतात. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेदेखील तिची खास मैत्रीण पूजा सावंतच्या लग्नासाठी खूपच उत्साही होती आणि तिचा हा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे. प्रार्थनाने पूजाच्या साखरपुड्याला नवऱ्यासह हजेरी लावली होती आणि यावेळी तिने मित्रपरिवरसह खूपच धमाल व मजा-मस्ती केली. याचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नुकतेच पूजाच्या साखरपुडा सोहळ्यातील काही खास शेअर केले आहेत. साखरपुड्यातील धमाल-मस्तीचा व्हिडीओ शेअर करत प्रार्थनाने पूजा व सिद्धेशच्या नव्या आयुष्यासाठी तिने खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये प्रार्थनासह तिचा नवरा, भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी महाजनी, श्रेयस सावंत, रुचिरा सावंत, सौमिल शृंगारपुरे असे पूजाचे सगळे जवळेचे मित्र-मैत्रीणी दिसत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये ती सगळ्या कलाकारांसह अनेक पोझ देताना पाहायला मिळत आहे. “पूजा व सिद्ध अभिनंदन” असं कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
प्रार्थनाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी पूजाला अभिनंदन म्हणत साखरपुड्यानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. तर अनेकांनी अभिनेत्रींच्या लुकचे कौतुकही केले आहे.
दरम्यान, पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच तिच्या रिलेशनशिपची घोषणा करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. अशातच अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला आहे. त्यामुळे आता पूजा कधी लग्न करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिल आहे.