शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अफेअर केलं तरी…”, अफेअरवरुन प्रश्न विचारताच प्रशांत दामलेंनी दिले स्पष्ट उत्तर, म्हणाले, “एका लग्नानंतर…”  

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 20, 2024 | 9:20 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi actor Prashant Damle talk about his affair in interview see the details

“अफेअर केलं तरी...”, अफेअरवरुन प्रश्न विचारताच प्रशांत दामलेंनी दिले स्पष्ट उत्तर, म्हणाले, “एका लग्नानंतर...”

मराठी नाटक, मालिका व चित्रपटांत अशा तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. मराठी नाटकांतील त्यांनी केलेल्या अनेक विक्रमांमुळे प्रशांत दामले यांना ‘नाटकाचे विक्रमादित्य’ म्हणूनही ओळखले जाते. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार काहीना काही कारणांनी चर्चेत राहत असतात. कधीकधी कलाकार हे त्यांच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक कारणांमुळे चर्चेत राहत असतात. पण प्रशांत दामले यांच्यासारखी व्यक्ती ही फक्त नी फक्त त्यांच्या कामासाठीच ओळखली जाते. प्रशांत दामले यांची मराठी मनोरंजन सृष्टीतील कारकीर्द ही प्रदीर्घ आहे. गेले ४० वर्ष ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पण या काळात त्यांच्याबद्दल कोणतेच वादविवाद समोर आलेले नाहीत आणि यावरून त्यांना एक हटके प्रश्न विचारण्यात आला.

प्रशांत दामले यांनी नुकतीच ‘सोलसम विथ सारिका’ नावाच्या एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी दामलेंना “४० वर्षांची तुमची प्रदीर्घ कारकीर्द आहे. या क्षेत्रातील मंडळींमध्ये वादविवाद, भांडणं किंवा अगदी अफेअर्स अशा गोष्टी होतात. त्या लोकांकडून खूप बारकाईने पहिल्या किंवा चर्चिल्या जातात. पण प्रशांत दामलेंच्या बाबतीत गेल्या ४० वर्षात कोणताही वादविवाद झालेली नाही, याचे कारण काय? असा प्रश्न विचारण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Prashant Damle (@damleprashant)

आणखी वाचा – “विलासराव देशमुखांनी काँग्रेस सोडली होती”, वडिलांबाबत ‘त्या’ व्यक्तीने बोलताच रितेश देशमुख भडकला, उत्तर देत म्हणाला, “खोटं तुम्ही आधी…”

यावर प्रशांत दामले गंमतीने “याचा अर्थ तुम्हाला काही कळत नाही” असं म्हणताच उपस्थितांमध्ये व प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. पुढे दामले असं म्हणाले की, “मी जे जे काही करतो ते जगात जावं असं मला कधीच वाटत नाही. माझं काम जगात जायला पाहिजे. गंमत बाजूला ठेवूया.  पण मी या इंडस्ट्रीत आल्यापासून इतकं काम करत आहे की कोणत्याही गोष्टीसाठी, अगदी अफेअरसाठीसुद्धा वेळ द्यावा लागतो. असं एका लग्नानंतर माझ्या लक्षात आलं आहे. तो वेळ जर दिला नाही तर खूप फटके पडतात. त्यामुळे मी जर वेळ देऊ शकत नसेल तर मी अफेअर कसं करणार? आणि अफेअर केलं तरी ते टिकणार कसं?. कारण मला माझं नाटक टिकवायचं आहे. कारण त्यातच माझा आनंद आहे”.

आणखी वाचा – “नणंदेसमोरच रवीने मला रस्त्यामध्ये मारायला सुरुवात केली अन्…”, ‘त्या’ असह्य वेदनांबाबत गश्मीर महाजनीच्या आईचा खुलासा, म्हणाल्या, “मारहाण…”

यापुढे भांडणाविषयी दामले असं म्हणाले की, “माझं कुणाशी भांडणही नाही. कारण मला जेव्हा संशय येतो, की या व्यक्तीबरोबर आपलं जमत नाही आहे. तेव्हा मी त्याच्यापासून भांडण व्हायच्या आधीच बाजूला होतो. कारण ही इंडस्ट्री खूप छोटी आहे आणि कधीतरी मला त्याच्याबरोबर काम करावं लागेल याची मला खात्री आहे.”

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainment newsMarathi newsprashant damleप्रशांत दामलेमनोरंजन बातमीमराठी अभिनेतेमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Actress Prarthana Behere is being trolled for mentioning Chhatrapati Shivaji Maharaj in a program see the details

लातूरमध्ये प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, लोक भडकले, म्हणाली, “शिवाजी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.