मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नणंदेसमोरच रवीने मला रस्त्यामध्ये मारायला सुरुवात केली अन्…”, ‘त्या’ असह्य वेदनांबाबत गश्मीर महाजनीच्या आईचा खुलासा, म्हणाल्या, “मारहाण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 20, 2024 | 9:50 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Ravindra Mahajani was killing me for no reason Madhavi revealed that incident

"नणंदेसमोरच रवीने मला रस्त्यामध्ये मारायला सुरुवात केली अन्...", 'त्या' असह्य वेदनांबाबत गश्मीर महाजनीच्या आईचा खुलासा, म्हणाल्या, "मारहाण..."

मराठीतील देखणा, रुबाबदार अभिनेता म्हणून रवींद्र महाजनी यांची लोकप्रियता ही सर्वश्रुत होती. रवींद्र महाजनी यांच्या अचानक आलेल्या मृत्यूच्या बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला होता. रवींद्र यांच्या निधनाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्या जवळ उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना चाहत्यांनी बरंच ट्रोल केलं. अशातच रवींद्र यांची पत्नी माधवी महाजनी यांनी ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रदर्शित झाले. या पुस्तकात माधवी यांनी रवींद्र यांच्याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत.

‘चौथा अंक’ या पुस्तकात माधवी यांनी रवींद्र यांच्याबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. रवींद्र यांना दारू, जुगारसारखे व्यसन असून रवींद्र हे माधवी यांच्यावर संशय घेत असल्याचेही त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. अशातच रवींद्र हे माधवी यांना मारत असल्याविषयीही भाष्य केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer)

आणखी वाचा – “त्या कलाकाराला सगळ्यांनी मानाचा मुजरा केला पण मी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितली ‘ती’ घटना, म्हणाली, “फक्त महाराजांनाच…”

माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ पुस्तकात या प्रसंगाबद्दल असं म्हटलं आहे की, “एकदा माझी नणंद, तिचे यजमान आणि आम्ही दोघं बाहेर जेवायला गेलो, गप्पा मारत छान जेवण झाले, आम्ही दोघे थोडे पुढे आणि मागून ते दोघे असे आम्ही तिथून निघालो. रवीला काय झालं कळलं नाही, तो अचानक रस्त्यातच मला मारू लागला. आमचं काही भांडण झालं नव्हतं, वाद नाही; त्यानं थेट मारहाण सुरू केल्यावर आम्ही गोंधळून गेलो.

आणखी वाचा – “विलासराव देशमुखांनी काँग्रेस सोडली होती”, वडिलांबाबत ‘त्या’ व्यक्तीने बोलताच रितेश देशमुख भडकला, उत्तर देत म्हणाला, “खोटं तुम्ही आधी…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “माझी नणंद आणि तिचे यजमान यांनी मध्ये पडून माझी रवींद्र पासून सुटका केली आणि आम्ही घरी आलो. येताना त्या दोघांना घरी सोडलं. पुढे निघाल्यावर पुन्हा त्याची मारहाण चालू झाली. याही वेळी मी पुन्हा गाडीतून मध्येच उतरले. त्यानंही गाडी थांबवली. तिथून रवीनं सुरू केलेलं बांधकाम ‘स्वरूप पार्क’ नावाचं कॉम्प्लेक्स होतं; तिथं मी गेले. वॉचमन ओळखीचा होता. त्यानं मला एका फ्लॅटचं दार उघडून दिलं. त्यानेच तिथली एक जुनी कॉट दिली त्यावरच मी ती रात्र काढली आणि सकाळी उठून घरी गेले”.

Tags: मनोरंजन बातमीमराठी अभिनेतेमराठी बातमीमाधवी महाजनीentertainment newsMadhavi Mahajanimarathi actorsMarathi Entertainment Newsरवींद्र महाजनीMarathi newsravindra mahajani
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Marathi actor Prashant Damle talk about his affair in interview see the details

“अफेअर केलं तरी...”, अफेअरवरुन प्रश्न विचारताच प्रशांत दामलेंनी दिले स्पष्ट उत्तर, म्हणाले, “एका लग्नानंतर...”  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.