मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करणारा अभिनेता व दिग्दर्शक म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुख हा स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आहे. रितेशने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नसला तरीदेखील तो सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असतो.
नुकताच लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. या समारंभात रितेश वडिलांच्या आठवणीत भावुक झाला असल्याचे पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचे त्यांच्या मनातही आले नाही
— मी भारतीय (@Core_punekar) February 18, 2024
रितेश देशमुख
Fact:
विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणूकीत सेना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती
लातूरमधील या कार्यक्रमात आपलं मत मांडताना रितेशने “विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडणं त्यांच्या मनातही आलं नाही” असं म्हटलं होतं. रितेशचा हा व्हिडीओ शेअर करत विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच एका एक्स (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्याने विलासरावांबद्दलची एक टिकात्मक पोस्ट शेअर केली आहे आणि त्याच्या या पोस्टवर रितेशने उत्तर देत त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
Untrue – pls go and fact check… https://t.co/EsD5QNCsyH
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 18, 2024
आणखी वाचा – Video : ‘देवों के देव महादेव’मधील पार्वतीचा शाही विवाहसोहळा संपन्न, लग्नासाठी अवाढव्य खर्च, व्हिडीओ व्हायरल
त्या नेटकऱ्याने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) “विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणुकीत सेना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.” अशी पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टवर रितेशने “हे पूर्णत: असत्य आहे. कृपया जा आणि या संबंधीत तथ्य तपासा.” असं म्हणत त्याला उत्तर दिलं आहे.
दरम्यान, या पोस्टवर अनेकांनी रितेशच्या बाजूने कमेंट्स करत अशी वक्तव्ये करून उगाच चर्चेत राहणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा, हे लोकं उगाच काहीही बोलून चर्चेत राहत असतात. त्यामुळे तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका” अशा अनेक कमेंट्स करत विलासराव व रितेश देशमुख यांच्याबद्दल अनेक गौरवोद्गार काढले आहेत.