सध्या मराठीत सर्वत्र एकाच चित्रपटची चर्चा सुरू आहे आहे आणि तो चित्रपट म्हणजे ‘झिम्मा २’. झिम्मा २ हा चित्रपट महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत आहेच. पण तया व्यतिरिक्त परदेशातही हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे आणि याच निमित्ताने दिग्दर्शक हेमंत ढोमेसुद्धा बराच चर्चेत आहे. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. कधी तो कामानिमित्त काही माहिती शेअर करत असतो. तर कधी त्याचे काह हटके फोटोस चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अशातच त्याने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. (Hemant Dhome On Instagram)
हेमंतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हेमंतने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी क्षिती जोगबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. आज दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांच्या लग्नाला ११ वर्ष झाली आहेत. त्या निमित्तानं हेमंतने दोघांचे लग्नातील काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत आणि या फोटोनिमित्ताने त्याने त्याच्या लग्नातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचबरोबर हे खास फोटो शेअर करत त्याने या फोटोखाली हटके कॅप्शनही लिहिले आहे. त्यामुळे या फोटोंनी व त्याखाली लिहलेल्या कॅप्शननी त्याने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा – लग्नानंतर पियुष-सुरुची यांच्या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो व्हायरल, डिझायनर गाऊनमध्ये दिसली नवी नवरी
हेमंतने या फोटोखाली “११ वर्षांपुर्वी जगातली सगळ्यात भारी गोष्ट घडली! या येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली! क्षिती जोग तुला तर माहितीच आहे, माझं तुझ्यावर अगदी वेड्यासारखे प्रेम आहे” असं म्हणत त्याने क्षितीला लग्नाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर हेमंतने या फोटोला ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटातील ‘साथीया’ हे गाणं लावलं आहे आणि “या गाण्यावरच पटली राव” म्हणजेच या गाण्यामुळे क्षिती त्याच्या प्रेमात पडली असल्याचे गंमतीत म्हटले आहे.
दरम्यान, हेमंत-क्षिती यांच्या लग्नाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मधुराणी प्रभुलकर, नम्रता संभेराव, पूजा सावंत, सायली संजीव, सोनाली खरे, समीर विध्वंस, अभिजीत खांडकेकर, सुकन्या मोने, अक्षय टांकसाळे अशा अनेक कलाकारांनी हेमंत-क्षितीच्या फोटोवर कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांना भावी आयुष्यासाठी आशीर्वादही दिले आहेत.