शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मावशी ऑन ड्युटी…”, लाडक्या भाचीबरोबर वेळ घालवत आहे जुई गडकरी, बालपणीच्या आठवणीतही रमली अन्…; म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 10, 2024 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jui Gadkari Family Time

"मावशी ऑन ड्युटी…", लाडक्या भाचीबरोबर वेळ घालवत आहे जुई गडकरी, बालपणीच्या आठवणीतही रमली अन्…; म्हणाली…

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळणे येताना पाहायला मिळत आहेत. ही मालिका काही वर्षांपासून सुरु असून टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळतेय. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीत खिळवून ठेवले आहे. मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसतात. तसेच इतर पात्रांनी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे. याआधी बऱ्याच मराठी मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी जुई आहे. (Jui Gadkari Family Time)

जुई तिच्या शांत, सुशील अशा स्वभावानं प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून सायली या भूमिकेतून जुईने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. याआधी जुईची ‘पुढचं पाऊल’ ही मालिका विशेष गाजली. सोशल मीडियावर ही जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. विशेषतः चाहत्यांबरोबर संवाद साधण्यासाठी ती आस्क मी एनिथिंग हे सेशन ठेवते. शिवाय सेटवरील बीटीएस व्हिडीओही चाहतांसह ती शेअर करताना दिसते. अशातच जुईने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये जुई तिच्या कुटुंबीयांना वेळ देताना दिसत आहे. मावशी व भाचीचं स्पेशल बॉण्डिंग या व्हिडीओमधून स्पष्टपणे पाहायला मिळते. या व्हिडीओत जुई तिच्या भाचीला बालगीत दाखवताना दिसत आहे आणि बालगीत पाहता पाहता तिची भाची झोपून गेलेली व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – अर्जुन-सायलीमध्ये दुरावा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावर होणार का वेगळे?, तर साक्षीचा चैतन्यवर संशय

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

या खास पोस्टला कॅप्शन देत जुईने असं म्हटलं आहे की, “My cupcake! मी मावशी ड्युटीवर आहे. लग्नाच्या गडबडीत लहान बाळांची चीडचीड होणं, त्यांना झोप येणं हे होतंच. मग करायचं काय जेणेकरुन बाळाच्या आई-बाबांना पण थोडी कामं करता येतील?, थोडा आराम करता येईल?. तर बाळाला आपली गोड मराठी बालगीतं ऐकवायची, दाखवायची. चांदोबा चांदोबा झालं, एका माकडाने काढलंय दुकान झालं, ये रे ये रे पावसा झालं, कोणास ठाऊक कसा झालं आणि आमचं पिल्लु आजुबाजुच्या आवाजात कधी गाढ झोपलं कळलंच नाही”.

आणखी वाचा – अहिल्यादेवींना मिळाली धमकी, पारूला पडलेलं स्वप्न होणार का सत्य?, मालिकेत येणार नवं वादळ

जुई पुढे म्हणाली, “मला अजुनही त्या गोड गोड बालगीतांच्या माझ्या लहानपणीची कॅसेट आठवते. दिवसभर ती गोड गाणी मी ऐकायचे. आजही युट्युबला ऐकते. तुम्हीसुद्धा त्या काळाला मिस करत आहात का?. मराठी बालगीतांसारख्या गोड गाण्यांची तुलना कशाशीच होऊ शकत नाही याच्याशी तुम्ही सहमत आहात का?”. जुईच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत.

Tags: entertainmentjui gadkariJui Gadkari Family Timemarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Marathi actress Prajakta Mali made her production debut and she is recently announced her new film.

प्राजक्ता माळीचं निर्मितीक्षेत्रात पदार्पण, मराठीतील मोठ्या चित्रपटाची केली घोषणा, पोस्टर समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.