अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्राजक्ताचे लाखो दिवाने चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून प्राजक्ता सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून नेहमीच पाहायला मिळते. याशिवाय प्राजक्ताचा स्वतःचा असा ज्वेलरी ब्रँड सुद्धा आहे. प्राजक्तराज असे या ब्रँडचं नाव असून ती या ब्रँड अंतर्गत अनेकदा चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर ही प्राजक्ता बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Prajakta Mali Post)
सोशल मीडियावरील प्राजक्ताचे हटके फोटोशूट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडताना दिसतात. अशातच आता प्राजक्ताने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिची आई तिच्याबरोबर दिसत आहे. यावेळी प्राजक्ता बहुप्रतीक्षित अशा दस्तऐवजावर सह्या करताना दिसत आहे. प्राजक्ताने नेमकं कोणत्या दस्ताऐवजावर सह्या केल्या आहेत हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
प्राजक्ताने ही पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “या पोस्टला कॅप्शन देत तिने लिहिलं, “२७ एप्रिल २०२४ रोजी सर्वात आवडत्या, बहुप्रतिक्षित कागदपत्रांवर सही केली. ही विवाह नोंदणी अजिबात नाही. या क्षणी माझे हृदय कृतज्ञतेने भरले आहे”. प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तर्क वितर्क लावत कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहे. “कोर्ट मॅरेज १००%”, “फरसाणची मोठी ऑर्डर मिळाली वाटतं”, “अच्छा म्हणजे आता अमुल पोस्टरवर त्या मुलीच्या जागी तुमचा फोटो दिसणार”, अशा कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा – अहिल्यादेवींना मिळाली धमकी, पारूला पडलेलं स्वप्न होणार का सत्य?, मालिकेत येणार नवं वादळ
यापूर्वी प्राजक्ताला बरेचदा लग्नाबाबत अनेक प्रश्न विचारले असल्याने तिने हे लग्नाचे रजिस्ट्रेशन नसल्याचा आधीच खुलासा केला आहे. त्यामुळे नक्की प्राजक्ता कोणत्या कागदपत्रांवर सह्या करत आहे याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.