Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : गेले काही दिवस मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या जोडीदारबरोबर विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतीच अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख या जोडीने एकमेकांबरोबर लग्नगांठ बांधत आपल्या वैवाहिक आयुष्याला नवीन सुरुवात केली आहे. अशातच काल (६ डिसेंबर) रोजी आणखी एक कलाकार जोडी विवाहबंधनात अडकली. अभिनेता पियुष रानडे व सुरूची अडारकर या जोडीने विवाहबंधनात अडकले. या कलाकार जोडीचे लग्नातील फोटो अचानक समोर आल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांनीही त्यांच्या लग्नसोहळ्याचे खास क्षण सोशल मीडियावरून शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनीही कमेंट्स करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
पियुष-सुरुची यांनी अगदी लग्नात पारंपरिक लूक परिधान केला होता. लग्नासाठी सुरुचीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर साजेसे दागिनेही तिने परिधान केले होते. तर पियुषने सुरुचीच्या लूकला साजेसा असा पांढऱ्या रंगाचा दाक्षिनात्य पद्धतीचा लूक केला होता. सुरुची-पियुषच्या लग्नाती सुंदर फोटोमध्ये पियुष तिला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. या फोटोतील सुरूचीच्या मंगळसूत्राने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सुरुचीने फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाकार मंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पियुष-सुरुची यांच्या लग्नाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनीही या सेलिब्रिटी कपलला शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा – “आमच्या नात्याबाबत…”, पियुष रानडेबरोबर लग्न करण्याबाबत सुरुची अडाकरचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “तो खूप…”
अशातच या जोडीचा रिसेप्शन लूकममधील काही खास फोटो समोर आले असून सोशल मीडियावर सध्या या फोटोची चर्चा सुरू आहे. पियुष-सुरुची यांनी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. यात पियुष-सुरुची यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोत त्याने काळ्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला असून सुरुचीने अबोली रंगाचा मोठा गाऊन परिधान केला आहे. या फोटोत दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहेत. त्याचबरोबर दोघेही या फोटोत एकमेकांबरोबर आगदी आनंदी व उत्साही दिसत आहेत. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत पियुषने तिचा हात हातात धरत रोमॅंटिक पोजमध्ये फोटो काढलं आहे तर दुसऱ्या फोटोत त्यांनी एकमेकांच्या जवळ येत क्लोज फोटो काढला आहे.
पियुष-सुरुची यांच्या या रिसेप्शन लुकमधील फोटोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर चाहत्यांना त्यांचे हे खास रिसेप्शन लूकमधील फोटो आवडल्याचेही कमेंट्सद्वारे सांगितले आहे. दरम्यान, पियुष-सुरूची ही जोडी ‘स्ट्रॉबेरी’ या नाटकाच्या निमित्तानं एकत्र आली होती. त्यानंतर सुरुची ‘अंजली’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. नुकत्याच प्रदर्शित होऊन गेलेल्या बाईपण भारी देवा या चित्रपटात सुरूची दिसली होती तर पियुष सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत काम करत आहे.