प्रत्येक कलाकाराच्या यशामागे त्याच्या पालकांचा भक्कम पाठिंबा असतो. त्याला घडवण्यात, त्याला नवी दिशा देण्यात त्यांच्या पालकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच कलाकार हे त्यांच्या पालकांना माध्यमांसमोर नेहमीच पुढे नेतात. मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. मालिका व चित्रपटांमध्ये दिसलेला भूषण प्रधान गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पडद्यावर फारसा दिसत नसला, मात्र तो लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूषणचे आई-वडील एकत्र राहत असले, तरी तो त्याचं पूर्ण नाव लिहिताना ‘भूषण सीमा प्रधान’ असं त्याच्या आईचं नाव लावतो. पण तो त्याचं पूर्ण नाव लावताना आपल्या आईचं नाव का लावतो? याचा खुलासा त्याने नुकताच एका मुलाखतीत दिला आहे. (Bhushan Pradhan reason to writes his mother name)
अभिनेत्री सुलेखा तळवलकरच्या युट्युब चॅनलवरील ‘दिल के करीब’ या पॉडकास्टमध्ये भूषणने नुकतीच हजेरी लावली. यावेळी अभिनेत्याने त्याच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल दिलखुलासपणे बोलला आहे. शिवाय, त्याने पूर्ण नाव लिहिताना आईचं नाव वापरण्यामागचा खुलासा केला आहे.
अभिनेता भूषण प्रधान म्हणाला, “अनेकांना वाटतं, की आपल्या आई-वडिलांचं पटत नाही किंवा त्यांचा घटस्फोट झाल्यावर आपण आपल्या नावापुढे आईचं नाव लावतो. मात्र, मी माझ्या वडिलांवरही तितकंच प्रेम करतो, जितकं मी आईवर करतो. मला घडवण्यामध्ये दोघांचाही वेगवेगळ्या वाटा आहे, पण आईचा तो कुठेतरी जास्त आहे. मी अभिनय क्षेत्रात काम करावं हे स्वप्न माझ्याबरोबर तिनेही पाहिलं आहे. जेव्हा मी बाबांना सांगायचो की, मला अभिनेता व्हायचं आहे त्यावेळेस माझं एमबीए झालं होतं. तेव्हा बाबा मला म्हणाले होते, की तुला जर तुझी ही आवड जपायची असेल तर तुला त्यासाठी पैसे उभे करावे लागतील, मात्र मी काहीही देणार नाही. पण आईने तसं केलं नाही. ती याबाबत अनेकदा माझ्याशी चर्चा करायची. तिने मला कधीही कुठलं काम करायला आडवलं नाही.”
हे देखील वाचा – “सर्व सीमा ओलांडून…”, ‘ताली’मध्ये तृतीयपंथीयाची भूमिका साकारल्यानंतर सुव्रत जोशीची पोस्ट, म्हणाला, “आयुष्य किती कठोर…”
पुढे तो म्हणाला, “पुण्यात एमजी रोडच्या सिग्नलवर मी पॅम्प्लेट वाटले, त्याचे मला दीडशे रुपये मिळायचे आणि ते जमवून मी माझा पोर्टफोलिओ तयार केला. मी याला स्ट्रगल नाही म्हणणार, कारण घरात पैसे होते. पण आपल्याला जर आपल्या करिअरसाठी हे सगळं करावं लागत असेल तर चांगलंच आहे. त्यामुळे त्याची एक खूप मोठी किंमत आहे. हे सर्व करत असताना मला आईने खूप पाठिंबा दिला. त्यामुळे मी जेव्हा अभिनेता झालो तेव्हा मी असं ठरवलं होतं की, आपण वडिलांचं आडनाव तर लावतो किंवा पूर्ण नावात त्यांचं नाव लिहिल्यामुळे त्यांचं नावही सर्वांना कळतं. पण जिने आपल्यासाठी कष्ट घेतले आहेत, त्या आईचं नाव कुणालाही कळत नाही.”
हे देखील वाचा – Video : “आम्हाला काय ऊत आलाय का?”, भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी व अवधुत गुप्तेमध्ये जोरदार भांडण, व्हिडीओ व्हायरल
“आणि हे सगळं बाबांनी स्वीकारलं होतं. त्यामुळे त्यांनीही माझ्या या निर्णयावर कधीच आक्षेप घेतला नाही. ते नेहमी म्हणतात, की तुला घडवण्यामध्ये आईचा वाटा मोठा असून तिच्यामुळे तुम्ही आहात. म्हणून ज्या आईने माझ्यासाठी कष्ट घेतले आहेत, तिचं नाव सगळ्यांना कळावं म्हणून मी ‘भूषण सीमा प्रधान’ असं नाव लावतो.” असा भूषणने या मुलाखतीत सांगितलं आहे.