मराठी सिनेसृष्टीत विविध कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली जागा मिळवली. त्यातील एक कलाकार म्हणजे भाऊ कदम. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या विनोदी शैलीतून खळखळून हसवणाऱ्यांच्या यादीत भाऊ कदम अग्रेसर आहेत. त्यांचे बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यांना पाहण्यासाठी त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. त्यामुळे गरबा आणि दांडियासह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांना विविध कलाकार हजेरी लावतात. अशाच एका रविवारच्या गरबा नाईट्स कार्यक्रमात भाऊ कदम यांनीही हजेरी लावली. यावेळी या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. सध्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ त्यांनी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(bhau kadam garba night as a special guest)
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात विविध पात्र साकारत सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या भाऊ कदम यांनी काल गरबा नाईट्सला उपस्थित होते. या कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांनी उपस्थित चाहत्यांचा आनंद, उत्साह आणखीनच वाढवला. या कार्यक्रमात आदित्य ठाकरेही उपस्थित होते. त्याचबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अरुण कदमही उपस्थित होते.
भाऊंनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांच्या कार्यक्रमातील येण्यापासून ते कार्यक्रमातील लगबगीपासून त्या कार्यक्रमातील सगळी मजा व मस्ती यात चित्रीत आहे. कार्यक्रमात भाऊंला भल्या मोठ्या फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमात भाऊने छान ठेकाही धरला. ड्रम वाजवत त्यांनी कार्यक्रमाला रंगत आली.
या व्हिडीओला बऱ्याच नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकऱ्याने कमेंट केली, ‘मुंबईमध्ये राहिल्यामुळे बँजो मंजे सॉफ्ट कॉर्नर रोटो दिसला की हात आपोआप वाजवायला वळतात भाऊ’, असं म्हणत कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘सर्वगुण संपन्न मराठी अभिनेता. भाऊसाहेब तुम्ही ग्रेट आहात’, असं लिहीत त्याने भाऊंच कौतुक केलं आहे.