बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरमान मलिकने आपल्या सुमधून आवाजाने सर्वांना वेड लावलं आहे. अरमानचा भलामोठा चाहता वर्ग आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. अरमान बरीच वर्षे आशना श्रॉफबरोबर रिलेशनशीपमध्ये होता. त्याने २८ ऑगस्टला आशनाला प्रपोजक करतानाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यांच्या साखरपुड्याची चाहत्यांना उत्सुकता होतीच. तर नुकतेच या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.अरमानने नुकतीच गर्लफ्रेंड आशना श्रॉफबरोबर साखरपुडा उरकला. काल म्हणजेच २२ ऑक्टोबरला रिंग सेरेमनी पूर्ण झाली. यावेळी त्यांच्या जवळचा मित्रपरीवार उपस्थित होता. त्यांचे फोटो सध्या स्टोरी रुपात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वतः अरमानने त्यांच्या साखरपुड्याचे मोहक क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Armaan malik got engaged to aashna Shroff)
शेअर केलेल्या फोटोत एका छान ठिकाणी हा साखरपुडा सोहळा संपन्न झालेला दिसतो. पांढऱ्या, गुलाबी फुलांची सजावट आणि रोशनाई त्यामुळे या ठिकाणाला वेगळंच तेज आलं होतं. या कार्यक्रमात आशनाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. ज्यावर लाल, पिवळ्या व हिरव्या रंगसंगतीत प्रिंट केलेली साधी साडी होती. या लूकवर तिने डायमंडचे दागिनेही घातले होते. तर अरमानने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता.

यात अरमान व आशना या दोघांची जोडी कपल गोल्स सेट केली आहेत. या साखरपुड्यातील विविध क्षण त्यांने शेअर केले आहेत. त्यात रिंग सेरेमनीचे अनेक फोटो शेअर केले. एका फोटोत तर दोघंही एकमेकांना लिप किस करताना दिसत आहेत. रिंग सोहळ्यात त्यांच्या मित्रपरिवाराने हजेरी लावली.अरमान मलिक व आशना श्रॉफची प्रेमकथा एखाद्या परीकथेसारखी आहे.

अरमानने ऑगस्टच्या सुरुवातीला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले होते. तो त्याच्या लेडी लव्हला प्रपोज करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. त्यातील एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं होतं की, ‘आणि आमची कायमची सुरुवात झाली’. अरमानने आपल्या मधुर आवाजातून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. ‘मैं हूं हीरो तेरा’, ‘हुआ है आज पहली’, ‘बोल दो ना जरा’, ‘बेसाबरियां’, ‘तुम जो मिले’, ‘उफ ये नूर’, ‘तेरे दिल में’, ‘कौन तुझे ही’ त्यातलीच काही ही हीट गाणी आहेत.