मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात आजवर ही जोडी कुठेही कमी पडलेली नाही. आजवर दोघांनीही मराठी सिनेसृष्टीत भरपूर काम करून अभियाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. सध्या ही जोडी त्यांच्या सोशल मीडियावरील वावरामुळे विशेष चर्चेत असते. कामाबरोबरच ही जोडी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. त्यांचे ट्रेंडिंग गाण्यावरचे रिल्स सोशल मीडियावर वायरल होताना पाहायला मिळतात. आजही त्यांचा तो उत्साह काळानुसार पुढे जाण्याची वृत्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते. (Avinash Narkar New Video)
अशातच अविनाश नारकर यांनी शेअर केलेलं एक रील सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे रील शेअर करत त्यांनी कॅप्शन दिल आहे की, सेटवराचा टाईमपास, मज्जा. दिवाळी पाडवा जवळ आला आहे म्हणून तमाम नवरेमंडळींसाठी खास मोलाचा सल्ला…!! Self Defence….!! अनुभवाचे बोल.” असं म्हटलं आहे. तर या रीलमधनं त्यांनी समस्त नवरेमंडळींना मोलाचा सल्ला दिला आहे. विनोदी छटा असलेलं हे रील शेअर करत अविनाश नारकर म्हणाले आहेत की, “नवरा बायकोच भांडण झालं ना की तुम्हाला एक सांगतो बायको कितीही रागवू द्या फक्त तिच्याकडे पाहत राहा. बोलायचं नाही. बोलला मग मेला तो, बोलायचं नाही. फक्त असं पाच मिनिटं पाहत राहायचं.”
अनेकांनी नारकरांच्या या रीलवर कमेंट केल्या आहेत. यावर त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकर हिने देखील कमेंट केली आहे. ऐश्वर्या यांनी अविनाश यांच्या या नव्या रीलवर कमेंट करत त्यांना पाहण्याच्या लूक देणारा व हसण्याचा ईमोजी शेअर केला आहे. तसेच एका नेटकऱ्याने कमेंट करत ‘ईशय संपला’ असं म्हटलं आहे. तर अनेकांनी या व्हिडिओला लाईक करत पसंती दर्शविली आहे.

ऐश्वर्या व अविनाश कायमच मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असतात. ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहेत. मालिकेतील रुपाली या त्यांच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांचं भभरून प्रेम मिळतं आहे. बरेचदा ऐश्वर्या व अविनाश त्यांच्या रील व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या कचाट्यातही अडकतात. दरम्यान ते नेटकर्यांना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलतीही बंद करताना दिसतात.