शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “याला म्हणतात संस्कारी मुलं”, जिनिलिया व रितेश देशमुख यांच्या मुलांनी फोटो काढणाऱ्यां पाहून जोडले हात, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 23, 2023 | 2:43 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Riteish genelia sons Namaste gesture to paparazzi

Riteish genelia sons Namaste gesture to paparazzi

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिलं जातं. त्यांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केलं आहे. पण ‘वेड’ हा चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली. ही जोडी २०१२मध्ये विवाहबंधनात अडकली. त्यांना दोन मुलं आहेत. ज्याची नाव रियान व राहिल अशी आहेत. हे जोडपं त्यांच्या क्यूटनेससाठी तर प्रसिद्ध आहेच पण ते आपल्या मुलांबरोबर जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा त्यांनी दिलेल्या संस्कारांचं कौतुक बऱ्याचदा केलं जातं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिनिलिया व रितेश यांचं कौतुक होत आहे. (Riteish genelia sons Namaste gesture to paparazzi)

रितेश व जिनिलिया नेहमी एकत्रित पाहायला मिळतात. बऱ्याचदा त्यांची मुलंही त्यांच्याबरोबर असतात. जेव्हा जेव्हा ते आपल्या आईवडिलांबरोबर कॅमेरा समोर येतात त्यावेळी ते रितेश व जिनिलियाबरोबर हात जोडताना दिसतात. आताही त्यांना पापाराजीं समोर प्रेम व सन्मानाने हात जोडले जे पाहता रितेश व जिनिलियाचं पालक म्हणून बरंच कौतुक होत आहे.  

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – विवेक ओबेरॉयच्या लग्नात सगळ्या एक्स गर्लफ्रेंडस् आल्या अन्…; अभिनेत्यानेच केला होता खुलासा, म्हणाला, “रिलेशनशिपमध्ये फसवणूक झाल्यानंतर…”

दरम्यान त्यांच्या पूर्ण परिवाराला एका फुटबॉल मैदानाच्या बाहेर पाहिलं गेलं. जिथे रितेश व जिनिलिया आपल्या मुलांना न्यायला आले होते. त्यावेळी तिथे पापाराझींनी त्यांना फोटोसाठी पोज द्यायला सांगितलं. त्यावेळी रियान व राहिल या दोघांनी त्याचे हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर रितेश व जिनिलियादेखील हाथ जोडताना दिसल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. रितेश व जिनिलिया यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले आहेत. रितेश बऱ्याचदा मुलांचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो. त्यात कधी ते आरती गाताना तर कधी नवीन गोष्टी शिकताना दिसतात. तर बऱ्याचदा ते रिती-रिवाजांचा हिस्साही बनतात. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by रितेश विलासराव देशमुख ( लातूरकर ) (@riteshdeshmukhofficial)

आणखी वाचा – “गाझामध्ये जर माझ्या मुलीचा जन्म झाला असता तर…”, लेकीबरोबरचा फोटो शेअर करत अस्वस्थ अवस्थेत दिसली स्वरा भास्कर, म्हणाली, “शाप घेऊन…”

नेटकरीही या व्हिडीओवर कमेंट व लाईकचा वर्षाव करताना दिसत आहे. नेटकरी रितेश व जिनिलियाचं कौतुकही करत आहे. त्यांनी मुलांवर दिलेल्या संस्कारासाठी त्यांचं विशेष कौतुक होत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली, ‘सगळ्या बॉलिवूड इंडस्ट्रीत यांचीच मुलं आहेत जी इतका आदर देतात. हाथ जोडून नमस्कार करणं. बाकीचे बॉलिवूड कलाकार मंडळी तर असेच निघून जातात’. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं की, ‘अशी असतात संस्कारी मुलं वाहह नायतर शाहरुखची मुलं ड्रग्स करण्यात सराईत. मीडियाला नीट प्रतिसादच नाही देत’, अशी कमेंट करत त्यांच्या संस्कारांचं कौतुक केलं आहे.

Tags: genelia d souzaNamaste gestureriteish deshmukhwin hearts
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Prasad Oak On Anand Dighe

Video : हजारोंची गर्दी, लोक पाया पडले अन्…; आनंद दिघेंच्या रुपात प्रसाद ओक ठाण्यातील टेंभीनाका देवीच्या चरणी, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.