शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हेमंत ढोमेच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, फोटो शेअर करत दिली माहिती, म्हणाला, “नवीन सदस्य लक्ष्मी…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 26, 2024 | 12:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
hemant dhome social media post

हेमंत-क्षितीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. हेमंतने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. हेमंत सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेला बघायला मिळतो. अनेकदा तो एखाद्या विषयावरील परखड मत एकदम स्पष्टपणे मांडताना दिसतो. काही महिन्यांपूर्वी त्याने एका गोमांस घेऊन जाणाऱ्या प्रकरणाबाबत भाष्य केले होते. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत अजितदादा पवार यांना टॅगदेखील केले होते. त्यामुळे हेमंतची समाजाप्रती असलेली जागरूकता दिसून आली होती. त्याच्या व्यावसायिक व सामाजिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेदेखील चांगलाच चर्चेत असलेला दिसून येतो. (hemant dhome social media post)

हेमंत त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग चाहत्यांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्याकडे आता सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. हेमंतच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याचे त्याने पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. दरम्यान हेमंतने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने एका गायीचे फोटो असून लिहिले आहे की, “आपल्या फर्स्टक्लास ढोमे फॅमिलीची नवीन सदस्य लक्ष्मी!”.

आणखी वाचा – “आपल्या सणांच्या पोस्ट टाकल्यास का?”, ख्रिसमसच्या फोटोंवरुन मराठी अभिनेत्याला नेटकऱ्याने सुनावलं, भडकून म्हणाला, “ईदलाही माहीमला जातो आणि…”

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

हेमंतने जे फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये एका फोटोमध्ये गाईबरोबर क्षिती जोग तर दुसऱ्या एका फोटोमध्ये स्वतः हेमंत दिसून येत आहे. या सर्व फोटोना कलाकार तसेच चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. दरम्यान हेमंतच्या प्राणी-मात्रांवर अनेकदा प्रेम करताना दिसून येतो. तसेच अनेकदा तो गावाकडे शेती करतानादेखील दिसतो. काही दिवसांपूर्वी हेमंत व क्षिती यांच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्याने सुंदर असा फोटो शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या होत्या.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचा फिल्मी स्टाईल संगीत सोहळा, जबरदस्त डान्स, धमाल अन्…; Photo viral

हेमंतने शेअर केलेल्या फोटोला हटके असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “या वेडेपणाचा एक तप पूर्ण. असाच वेडेपणा चालू ठेऊ. बाकी काय होईल मग आपोआप. लव्ह यु पाटलीण बाई”. हेमंत व क्षिती हे २०१२ साली लग्नबंधनात अडकले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ‘सावधान शुभमंगल’ या नाटकाच्या तालमीदरम्यान भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Tags: hemant dhomekshitee jogsocial media post
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Jaya bhattacharya rescue puppy

श्वानाच्या दीड महिन्याच्या पिल्लावर तरुणाकडून लैंगिक अत्याचार, अभिनेत्रीने केले उपचार, पोस्ट करत म्हणाली, "अशी वेळ कोणावरही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.