टेलिव्हिजनवरील ‘क्योकी सास भी कभी बहू थी’, ‘थपकी प्यार की’ या मालिकांमधून पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जया भट्टाचार्य. अभिनयाबरोबरच त्या पशू संवर्धनाचेदेखील काम करतात. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये त्यांनी एका श्वाना वाचवल्याचे दिसून येत आहे. एका तरुणाने या श्वानाच्या छोट्या पिल्लाचे लैंगिक शोषण केले होते. त्या पिल्लाच्या उपचारासाठी घेऊन जाताना त्या दिसत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्या छोट्या पिल्लाला बास्केटमध्ये ठेवलेले दिसून येत आहे. तसेच डायपरदेखील घातले आहे आणि पायाला पट्टी बांधलेलीदेखील दिसून येत आहे. अभिनेत्री या पिल्लावर उपचार झाल्याचे सांगितले मात्र त्याला खूप वेदना होत असल्याचे सांगितले आहे. (Jaya bhattacharya rescue puppy)
जया यांनी सोशल मीडियावरदेखील पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “राक्षसी वृत्तीच्या तरुणाकडून त्या पिल्लावर अत्याचार झाले आहेत. हे कोणत्याही व्यक्तीच्या विचारांच्या पलीकडील आहे. त्या व्यक्तीला कधीही अशा वेदनेचा सामना करावा लागला नाही हे त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये. या पिल्लाबरोबर असं व्हायला नको हवं होतं. पण त्या अपराधी व्यक्तीला सोडूनदेखील देण्यात आलं आहे ही निराशेची बाब आहे”.
दरम्यान जया यांच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. मुक्या जनावरांची सेवा करत खूप चांगले काम करत असल्याचेही अनेकांनी म्हंटले आहे. जया यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर “तो अपराधी कुठे आहे?”, असे विचारले आहे. तसेच एकाने लिहिले की, “त्या व्यक्तीचे असे बाहेर फिरणे सुरक्षित नाही. आज पिल्लू होतं उद्या कदाचित एखादं माणसाचं बाळ असेल”, दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, “हे खूप भयंकर आहे”, तसेच अजून एकाने लिहिले की, “त्या छोट्या पिल्लासाठी खूप वाईट वाटत आहे”, अजून एकाने लिहिले की, “देव त्या पिल्लाला लवकर बरे करो”. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जया यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्यांनी आजवर ‘सिर्फ तुम’, ‘फिजा’, ‘देवदास’, ‘लज्जा’, ‘एक विवाह ऐसा भी’, ‘मीमी’ आशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘रंगोली, ‘अंबर धारा’, ‘बनू मै तेरी दुल्हन’ या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसल्या आहेत.