मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. हेमंतने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. हेमंत सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेला बघायला मिळतो. अनेकदा तो एखाद्या विषयावरील परखड मत एकदम स्पष्टपणे मांडताना दिसतो. काही महिन्यांपूर्वी त्याने एका गोमांस घेऊन जाणाऱ्या प्रकरणाबाबत भाष्य केले होते. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत अजितदादा पवार यांना टॅगदेखील केले होते. त्यामुळे हेमंतची समाजाप्रती असलेली जागरूकता दिसून आली होती. त्याच्या व्यावसायिक व सामाजिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेदेखील चांगलाच चर्चेत असलेला दिसून येतो. (hemant dhome social media post)
हेमंत त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग चाहत्यांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्याकडे आता सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. हेमंतच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याचे त्याने पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. दरम्यान हेमंतने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने एका गायीचे फोटो असून लिहिले आहे की, “आपल्या फर्स्टक्लास ढोमे फॅमिलीची नवीन सदस्य लक्ष्मी!”.
हेमंतने जे फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये एका फोटोमध्ये गाईबरोबर क्षिती जोग तर दुसऱ्या एका फोटोमध्ये स्वतः हेमंत दिसून येत आहे. या सर्व फोटोना कलाकार तसेच चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. दरम्यान हेमंतच्या प्राणी-मात्रांवर अनेकदा प्रेम करताना दिसून येतो. तसेच अनेकदा तो गावाकडे शेती करतानादेखील दिसतो. काही दिवसांपूर्वी हेमंत व क्षिती यांच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्याने सुंदर असा फोटो शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या होत्या.
हेमंतने शेअर केलेल्या फोटोला हटके असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “या वेडेपणाचा एक तप पूर्ण. असाच वेडेपणा चालू ठेऊ. बाकी काय होईल मग आपोआप. लव्ह यु पाटलीण बाई”. हेमंत व क्षिती हे २०१२ साली लग्नबंधनात अडकले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ‘सावधान शुभमंगल’ या नाटकाच्या तालमीदरम्यान भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.