सध्या सर्वत्र लग्नाचे वातावरण आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. ‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील आरोहीची भूमिका सकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कौमुदीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. तिच्या हळदी समारंभाचे व मेहंदी समारंभाचे काही फोटो समोर आले आहेत. कौमुदीच्या साधेपणाच्या हळदीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. अशातच आता तिच्या संगीत सोहळ्याचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये कौमुदी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. तर ही संगीत रात्र तिच्यासाठी खूपच स्पेशल असलेली दिसून येत आहे. कौमुदीच्या संगीत सोहळ्यात नक्की काय काय झालं? हे जाणून घेऊया. (kaumudi walokar sangeet ceremony)
काही दिवसांपूर्वीच कौमुदीच्या लग्नाची बातमी समोर आली. त्यानंतर ‘आई कुठे…’च्या सेटवर तिच्या सहकलाकरांनी तिच्यासाठी खास केळवणदेखील ठेवलं. त्यानंतर तिचा मेहंदी व हळदी समारंभ पार पडला. अशातच आता तिच्या संगीत सोहळ्याचे सुंदर असे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. समोर आलेल्या फोटोमध्ये कौमुदीने सुंदर असा सोनेरी-चंदेरी लेहंगा परिधान केला आहे. तसेच तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजे आकाशनेदेखील साजेशी अशी काळ्या-सोनेरी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. यामध्ये दोघांचाही खूप सुंदर लूक दिसून येत आहे.
संगीत सोहळ्यादरम्यान कौमुदी व आकाश डान्स करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. या सोहळ्यामध्ये दोघांच्याही कुटुंबातील सदस्य व मित्र-मंडळी उपस्थित असलेली दिसून आली. दरम्यान कौमुदीच्या सर्व फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत असलेली दिसून येत आहे. यावेळी कौमुदीच्या साध्या पण सुंदर मेकअप व छान आशा हेअर स्टाइलने लक्ष वेधून घेतले आहे.
गेल्या वर्षी कौमुदीचा साखरपुडा पार पडला. आता लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. कौमुदी आकाशबरोबर लवकरच संसार थाटणार आहे. तिच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तिचे चाहते मंडळी या लग्नाची वाट बघत आहेत.