शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रात्रीच्या प्रयोगानंतर मुंबईत येताच संकर्षण कऱ्हाडेच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “बसने प्रवास करुन यायचं अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 18, 2024 | 10:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade Post

रात्रीच्या प्रयोगानंतर मुंबईत येताच संकर्षण कऱ्हाडेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, "बसने प्रवास करुन यायचं अन्..."

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने मालिकाविश्वाकडून ब्रेक घेत काही काळ नाटकविश्वाकडे वळला आहे. सध्या तो त्याचा संपूर्ण वेळ रंगभूमीला देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तू म्हणशील तसं, नियम व अटी लागू या दोन्ही नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत संकर्षणने प्रेक्षकांची मन जिंकली. या दोन्ही नाटकांचे सध्या जोरदार प्रयोग सुरु असलेले पाहायला मिळत आहेत. (Sankarshan Karhade Post)

अभिनयाव्यतिरिक्त कविता करणं, लिखाण व सूत्रसंचालन अशा विविध भूमिका साकारत संकर्षणने आजवर प्रेक्षकांच्या मनात त्याची जागा निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह काही ना काही शेअर करत असतो. अशातच संकर्षण सध्या नाटकाच्या प्रयोगानिमित्त प्रवास करण्यात व्यस्त असल्याच समोर आलं. संकर्षण सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत याबाबतचे अपडेट हे देत असतो.

आणखी वाचा – ‘मन उडू उडू झालं’ फेम ‘या’ अभिनेत्याची ‘धर्मवीर २’ चित्रपटात वर्णी, साकारणार ‘ही’ भूमिका, खास फोटो शेअर करत म्हणाला…

सध्या एका नाटकाचा दौरा पूर्ण करत संकर्षण नाशिकहुन मुंबईत परतला आहे. स्वप्नांची मायानगरी असणाऱ्या या मुंबईला पोहोचताच तिथल्या स्पेशल जागेचा फोटो शेअर करत त्याने या फोटोला दिलेलं कॅप्शन साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. “रात्रीच्या प्रयोगानंतर नाटकाच्या बसने प्रवास करुन मुंबईत यायचं आणि सकाळी ७.१५ वा. दादर मध्ये चहा, बन मस्का खायचा” असं म्हणत त्याने मुंबईतील दादर येथे नाश्ता करतानाचा फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आणखी वाचा – आदिनाथ कोठारेशी जोडलं गेलं पूजा सावंतच नाव, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “तो फोटो पोस्ट केल्यानंतर…”

संकर्षण नाटकाच्या प्रयोगानिमित्त जगभरात प्रवास करत असतो. इतकंच नव्हे तर तो ज्या ठिकाणी जातो तेथील प्रसिद्ध असणाऱ्या जागांना तो आवर्जून भेट देतो. शिवाय संकर्षण प्रत्येक ठिकाणी स्पेशल असणाऱ्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतो. याबाबतच्या अनेक पोस्ट तो वेळोवेळी शेअर करत त्याच्या चाहत्यांना याबाबतची अधिक माहिती देत असतो.

Tags: entertainmentmarathi actorsankarshan karhadesankarshan karhade instagramsankarshan karhade post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Marathi actress Abhidnya bhave give support to bigg boss 17 fame ankita lokhande see the details

Bigg Boss 17 : "तू खूप…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अंकिता लोखंडेला पाठिंबा, म्हणाली "खरी व प्रामाणिक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.