‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम. ते या कार्यक्रमात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करतात. ते जितके त्यांच्या विनोदी शैलीसाठी ओळखतात, तितकेच त्यांच्या आगळ्यावेगळ्या भाषेसाठी सुद्धा ओळखले जातात. म्हणून अरुण यांची ओळख ‘लाडके दादूस’ अशी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी लाडके दादूस आजोबा झाले असून नातवाच्या येण्याने ते प्रचंड आनंदी आहेत. (Arun Kadam shares his Grandson video)
आजोबा झाल्यानंतर अरुण कदम नेहमीच त्यांच्या नातवाचे अनेक फोटोज व व्हिडीओज त्यांच्या चाहत्यांसह शेअर करतात. अरुण यांच्या नातवाचं नाव अथांग असून त्याच्या पहिल्या दिवाळीला आजोबांनी पहिली झलक दाखवली होती. सिद्धिविनायक दर्शनाचे फोटोज असो, किंवा बारश्याचे व्हिडीओ असो. लाडके दादूस हे सतत नातवाबरोबरचे काही गोड क्षण शेअर करत राहतात. आता नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे देखील वाचा – अमृता देशमुखच्या मंगळसूत्राच्या डिझाइनची जोरदार चर्चा, तर नवऱ्याने बायकोच्या नावाचं घातलेलं युनिक लॉकेट ठरलं लक्षवेधी
अरुण यांनी नुकतंच नातू अथांगचा एक हटके व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो विविध करामती करताना दिसतो. या व्हिडिओत त्यांची एका जुन्या गाण्यातील एक झलक पाहायला मिळत असून त्यानंतर अथांगचे काही फोटोज कोलाजच्या रूपात पाहायला मिळतात. या व्हिडिओमध्ये तो अतिशय गोंडस दिसत आहे. यावेळी अथांगच्या हातात ग्लोव्हस दिसत आहे. या व्हिडिओला त्यांनी “बॉक्सर भाई आ गया है”, असं हटके कॅप्शन दिलं आहे.
हे देखील वाचा – “सुख म्हणजे…” मालिकेतील जुने कलाकार आऊट तर नवीन कलकार इन, मराठीतील ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांची दमदार एन्ट्री
नातू अथांगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकरी व चाहते यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. गेल्या १९ ऑगस्ट रोजी अरुण यांची लेक सुकन्या हिला पुत्रप्राप्ती झाली. त्यानंतर त्यांच्या नातवाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. काही काळाने अथांगचा पारंपरिक पद्धतीने बारसं पार पडलं होतं, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.