शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अयोध्येत पोहोचलं ओक कुटुंब, प्रसादने पत्नी, मुलांसह रामलल्लाचं घेतलं दर्शन, मराठमोळ्या पेहरावातील फोटोही केले शेअर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 5, 2024 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Oak Family Visit Ram Mandir Temple

अयोध्येत पोहोचलं ओक कुटुंब, प्रसादने पत्नी, मुलांसह रामलल्लाचं घेतलं दर्शन, मराठमोळ्या पेहरावातील फोटोही केले शेअर

२२ जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयाने एका सणासारखा साजरा केला. कारण बऱ्याच वर्षांपासून होणाऱ्या राम मंदिर प्रतिष्ठापनेला या दिवशी पूर्णता मिळाली. राम मंदिर प्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी झाली. अखेर या दिवशी रामलल्लाचे दर्शन घेत प्रत्येक भारतीयाने हा दिवस अगदी थाटामाटात साजरा केला. राजकीय मंडळी, दिग्गज मंडळी तसेच कलाकार मंडळींनी या दिवशी अयोध्येत हजेरी लावत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. काही कलाकारांना त्यादिवशी तिथे जाता आलं नाही त्यांनी नंतर जाऊन मंदिराला भेट दिलेली पाहायला मिळाली. (Prasad Oak Family Visit Ram Mandir Temple)

अशातच मराठी विश्वातीलही काही कलाकार मंडळींनी अयोध्येतील राम मंदिराला हजेरी लावलेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वीच अभिनेता स्वप्नील जोशीने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राम मंदिर अयोध्या येथे हजेरी लावली. यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या कलाकाराने सहकुटुंब राम मंदिर येथे हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळालं. अभिनेता प्रसाद ओक त्याच्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येला पोहोचला आहे. प्रसाद त्याची पत्नी मंजिरी व त्यांची दोन मुलं सार्थक व मयांक यांच्यासह अयोध्येत राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला.

आणखी वाचा – ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अभिनेत्याची बायको दिसते इतकी सुंदर, सौंदऱ्याच्या बाबतीत मराठी अभिनेत्रींनाही देते टक्कर

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

सोशल मीडियावर प्रसादच्या बायकोने एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली. यावेळी तिने विमानात बसताना पासून ते तिथं गेल्यानंतरच्या पूर्ण प्रवासाची झलक या व्हिडीओमधून शेअर केली. यावेळी ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’पासून ते राम मंदिरातील दर्शनापर्यंतचा प्रवास पाहायला मिळाला. अगदी मराठमोळ्या पारंपरिक अंदाजात त्यांनी रामाचं दर्शन घेतलेलं पाहायला मिळालं. राम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर चौघांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. एकत्र फोटो शेअर करत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. सोशल मीडियावर मंजिरी व प्रसाद बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बरेचदा त्यांचे ट्रेंडिंग, रील व्हिडीओही चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसतात.

आणखी वाचा – कर्क राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मिळणार यश, तर कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात मिळेल यश, जाणून घ्या…

प्रसादच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, प्रसाद त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतोय. लवकरच तो ‘महापरिनिर्वाण’, ‘पठ्ठेराव बापू’, ‘वडापाव’ यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tags: marathi actorprasad oakprasad oak familyPrasad Oak Family Visit Ram Mandir Temple
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Gaurav More Viral Look

हुबेहूब कालकेय! गौरव मोरेच्या नव्या लूकची रंगलीय चर्चा, नेटकऱ्यांनी अभिनेत्यासह मेकअप दादांचंही केलं कौतुक, म्हणाले….

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.