बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकीसह मोठा पडदा गाजवण्यास किंग खान शाहरुखची तयारी सुरु, चित्रपटाचं नावंही आलं समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 21, 2023 | 6:54 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shahrukh Khan And Suhana Khan New Movie

लेकीसह मोठा पडदा गाजवण्यास किंग खान शाहरुखची तयारी सुरु, चित्रपटाचं नावंही आलं समोर

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील लकी वर्ष ठरलं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्याच्या या वर्षाची सुरुवात त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पठाण’ने झाली आणि त्यानंतर ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले. आता पुढच्या ‘डिंकी’ या चित्रपटाबाबतही सिनेसृष्टीत अशाच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. यानंतर समोर आलेल्या शाहरुखच्या आणखी एका बातमीने चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. शाहरुख त्याच्या लेकीसह म्हणजेच सुहानाबरोबर चित्रपटात झळकणार असल्याचं समोर आलं आहे. (Shahrukh Khan And Suhana Khan New Movie)

सुहानाचा हा चित्रपटात मोठ्या पडद्यावरील पदार्पण असणार आहे. याशिवाय सुहाना नेटफ्लिक्सच्या ‘द आर्चीज’ या शोमधून ओटीटीवरील चित्रपटांमध्ये प्रवेश करणार आहे. वडील व मुलीच्या या हटके जोडीचा हा पुढचा चित्रपट ऍक्शनपॅक्ड थ्रिलर असणार असल्याचे बोलण्यात येत आहे. यानंतर बापलेकीच्या या नव्या चित्रपटाचे नावही समोर आले आहे.

आणखी वाचा – Video : हटके पोझ, अन्…; अरुण कदमांच्या नातवाचा हटके अंदाज, व्हिडीओ व्हायरल, म्हणाले, “बॉक्सर भाई…”

नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, शाहरुख व सुहानाच्या या चित्रपटाचे नाव ‘किंग’ असणार असल्याचं समोर आलं आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी म्हणजेच जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. हा एक ऍक्शनपट असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर बापलेकीची जोडी पाहणं रंजक ठरणार आहे. तसेच जानेवारीपासून चित्रपटाचं चित्रीकरण कोणताही ब्रेक न घेता पूर्ण केलं जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच हा चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर असला तरी हा चित्रपट शाहरुखच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’पेक्षा खूपच वेगळा असेल, असंही बोललं जात आहे.

आणखी वाचा – Bigg boss 17: मन्नारा चोप्राबरोबर जोडलं जातंय मुनव्वर फारुकीचं नाव, गर्लफ्रेंडने पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप, म्हणाली, “सगळंच खरं असतं असं…”

शाहरुख व सुहाना यांच्या या चित्रपटात भरपूर ऍक्शन सीन्स असले तरी चित्रपटाचे कथानक हे भावनिक मुद्द्यांवर भाष्य करणारे असणार आहे. सध्या शाहरुख खान २२ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या आगामी डंकी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. या चित्रपटात शाहरुखशिवाय तापसी पन्नू, विकी कौशल व बोमन इराणी हे कलाकार देखील दिसणार आहेत.

Tags: bollywood movienew movieshahrukh khanShahrukh Khan And Suhana Khan New Moviesuhana khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Madhavi Nemkar emotional post

'सुख म्हणजे…' फेम माधवी निमकरची चाहत्यांसाठी खास पोस्ट, कपिल होनरावबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली, "शालिनी-मल्हारचा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.