शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य आलं सुभेदार कुटुंबासमोर, प्रियाने केला पर्दाफाश, आता तरी प्रेमाची कबुली देणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 5, 2024 | 10:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य आलं सुभेदार कुटुंबासमोर, प्रियाने केला पर्दाफाश, आता तरी प्रेमाची कबुली देणार का?

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या समोर आलेल्या भागात एक रंजक ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, अर्जुन व सायलीने साक्षीच्या खऱ्या चेहऱ्याबद्दल सांगून चैतन्यचे डोळे उघडलेले असतात. त्यामुळे घरी परतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो. तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं तुम्हाला गिफ्ट म्हणून यात काय हवं आहे?, ते मला तुम्ही सांगा. यावर सायली विचार करून सांगते, असं म्हणत मी जे मागेल ते मला द्याल का?, असं म्हणते. त्यावर अर्जुन हो असं सांगतो, पण सायली म्हणते मला आत्ता नको आहे, वेळ आली की मी हे गिफ्ट मागेल तेव्हा तुम्ही मला ती गोष्ट नक्की द्या. (Tharal Tar Mag Serial Update)

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कल्पना व प्रताप सायली व अर्जुनवर संपूर्ण घराची जबाबदारी सोपवण्याचं ठरवतात. आणि कौतुक सोहळा करण्याचं ठरवतात. कल्पना सायली व अर्जुनला आवाज देते आणि खाली बोलवते, त्यावेळेला पूर्णा आजीसुद्धा येते. पूर्णा आजी विचारते हे नेमकं काय चालू आहे, यावर कल्पना सांगते तुम्ही आधी बसून घ्या तुम्हाला सगळं सांगतो. त्यानंतर सायली व अर्जुन खाली आल्यानंतर प्रताप सोन्याचा विडा जो त्याच्या वडिलांनी त्यांना दिलेला असतो तो विडा अर्जुनच्या हातात ठेवतात आणि सांगतात की हा विडा मला माझ्या वडिलांनी दिला होता आणि तेव्हापासून या घराची संपूर्ण जबाबदारी मी सांभाळली आता हा विडा मी तुला देतो आणि तू आणि सायलीने मिळून ही जबाबदारी सांभाळायची आहे.

आणखी वाचा – “त्याला दुःख होऊ शकतं कारण…”, नवऱ्याबरोबर सोशल मीडियावर फोटो पोस्ट न करण्यावरुन अमृता खानविलकरचं भाष्य, म्हणाली, “ट्रोल करणं…”

View this post on Instagram

A post shared by ठरलं तर मग..!!???? (@tharlatarmag_official)

हे ऐकून पूर्णा आजी नाराज होतात. त्या म्हणतात प्रताप हे सर्व करण्यास घाई तर करत नाही आहेस ना असं मला वाटतं, असं म्हणत त्या तिथून निघून जातात. तर इकडे साक्षी व चैतन्य बोलत असतात तेव्हा साक्षी म्हणते की मी काही तासांसाठी बाहेर जात आहे. यावर चैतन्य म्हणतो की, तू कुठे जातेस. तेव्हा साक्षी मनात विचार करते की, आता प्रियाला भेटायचा प्लॅन आपल्याला चेंज करावा लागेल आणि यालाच आपल्या सोबत घेऊन जावं लागेल असा विचार करत ती म्हणते, मी शॉपिंगला जात आहे. तू माझ्याबरोबर येत आहेस, मला तुझ्या आवडीचं सगळं काही घ्यायचं आहे. यावर चैतन्य म्हणतो, तुझ्याबरोबर शॉपिंगला यायचं म्हणजे दिवस गेला मी नाही येऊ शकत आपण डायरेक्ट लंचलाच भेटूया. यावर साक्षीला निमित्तच मिळतं आणि साक्षी घराबाहेर पडते. त्यानंतर ती प्रियाला भेटते आणि ती प्रियाला सगळं काही खरं सांगते. प्रियाला सांगते की, अर्जुन व सायली यांचं खोटं लग्न झालेलं आहे. त्यांच्यात खरं प्रेम नाही आहे. हे ऐकल्यावर प्रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यानंतर मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, प्रिया सुभेदारांच्या घरी येते आणि पूर्णा आजीला सांगते की अर्जुन व सायलीचं खोटं लग्न झालं आहे. त्यांचे एकमेकांवर प्रेम नाही.

आणखी वाचा – “अंग दिसू नये म्हणून मी…”, साडी नेसण्यावरुन भाऊ कदम यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “जाड असल्यामुळे पोट वगैरे दिसणं…”

त्यानंतर मालिकेच्या भागात पूर्णा आजी सायलीला हाताला धरून देवघरात घेऊन जातात आणि सांगतात की, देवासमोर हात ठेव आणि सांग की तुझं आणि अर्जुनचं लग्न झालेलं आहे आणि तुझं अर्जुनवर प्रेम आहे, हे ऐकल्यावर सायली देवासमोर हात ठेवते आणि असं बोलताना दिसते की, माझं आणि यांचं लग्न झालेलं आहे आणि माझं यांच्यावर भरपूर प्रेम आहे, हे सगळं काही अर्जुन देखील पाठीमागे उभा राहून पाहत असतो. आता सायलीने एकतर्फी प्रेमाची कबुली ही दिलेलीच असते आता अर्जुन प्रेमाची कबुली केव्हा देणार?, सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नक्की काय होणार, हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.

Tags: marathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Prasad Oak Family Visit Ram Mandir Temple

अयोध्येत पोहोचलं ओक कुटुंब, प्रसादने पत्नी, मुलांसह रामलल्लाचं घेतलं दर्शन, मराठमोळ्या पेहरावातील फोटोही केले शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.