Priyadarshini Indalkar welcome New Family Membar: मराठी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक उत्तम अभिनेत्रीचं वरदान लाभलं आहे. इतक्या स्पर्धेत ही अनेक अभिनेत्रींनी खंबीरपणे स्वतःची ओळख निर्माण केली आहे.आणि त्याजोरावर अनेक अभिनेत्री स्वतःची स्वप्न पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत.सिनेसृष्टीत पदार्पण करणं, टिकून राहणं आणि आपल्या कलेच्या जोरावर उंच भरारी घेणं ही नक्कीच धाडसाची गोष्ट आहे.कलाक्षेत्रात कायम काम असेलच, कायम पैसे येतीलच याची हमी नसते आणि या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभं रहाणं आणि स्वप्न पूर्ण करणं ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे.(Priyadarshini Indalkar welcome New Family Membar)
अनेक अभिनेत्री सध्या आपली ही स्वप्न पूर्ण करताना दिसत आहेत. कोणी स्वतःच घर घेतंय, काहींनी अभिनय क्षेत्रतील कारकीर्द सांभाळून स्वतःचे व्यवसाय सुरु केले, तर अनेकांनी हक्काची गाडी घेतली.नुकतीच अभिनेत्री रसिक सुनीलने मर्सिडीझ बेन्झ जीएलए ही महागडी गाडी खरेदी केली. रसिकाने गाडी घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. रसिकाच्या पाठोपाठ आता अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने या यादीत स्वतःच नाव कोरलं आहे. प्रियदर्शनीने देखील Maruti Suzuki Nexa ची गाडी घेतली आहे.
प्रियदर्शनीने खरेदी केली नवीन गाडी (Priyadarshini Indalkar welcome New Family Membar)
प्रियदर्शनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून नवीन गाडीचे फोटो शेअर केले आहेत. कुटुंबासोबत मिळून प्रियदर्शनीने या नवीन सदस्याच स्वागत केलं आहे.या फोटोजच्या कॅप्शन मध्ये प्रियदर्शनीने म्हंटल, “२३.०८.२३
New member added to the family ! वाढदिवसाला अनेकांनी विश केलं, “तुझी स्वप्न पूर्ण होवोत” त्या सर्वांना ‘Thank you’ !आणि माझ्यासोबत माझ्या आनंदात नाचणाऱ्या सर्वांचेही तितकेच अभिनंदन ! PS – या सगळ्या फोटोंमध्ये आनंद ओसांडुन वाहतोय पण Number 7 IS THE WINNER” प्रियदर्शनीने तिच्या बहिणीचं कौतुक केलंय. गाडी घेतल्याचा जास्त आनंद बहिणीला झालाय, असं ती म्हणते.
हे देखील वाचा: रसिका सुनीलने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क
अनेक कलाकारांनी कमेंट करत प्रियदर्शनीच अभिनंदन केलं आहे. हास्यजत्रेतील शिवाली परबने “Heyy अभिनंदन परी. आणि Igloo चं स्वागत”. अशी कमेंट करत प्रियदर्शनीच्या नवीन सदस्याच स्वागत केलं आहे.’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रियदर्शनी घराघरात पोहचली. तर ‘फुलराणी’ चित्रपटाने प्रियदर्शनीला वेगळी ओळख निर्माण करून दिली.