बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा सध्या खूप चर्चेत आहे. त्याची भाची व टेलिव्हिजन अभिनेत्री आरती सिंहच्या लग्नात तो उपस्थित राहिला होता. त्यानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये त्याच्याबद्दल खूप चर्चा होऊ लागली. ८०-९० च्या दशकात त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. अनेक चित्रपटांमध्ये त्याने विविध भूमिका सकारल्या होत्या. त्याने २०१९ साली तो शेवटचा चित्रपटात दिसून आला होता. त्यानंतर तो काही रिॲलिटी शोचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. पण आता तो मनोरंजन क्षेत्रापासून लांब असलेला दिसून येत आहे. (actor govinda networth)
‘हिरो नं १’, ‘आंटी नं १’, ‘हद कर दी आपने’, ‘पार्टनर’ अशा अनेक हिट चित्रपटातून त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पण आता कोणत्याही चित्रपट किंवा कार्यक्रमांमध्ये तो काम करताना दिसत नाही. हातात कोणतेही काम नसतानाही त्याचे उत्पन्न कसे सुरु आहे? त्याचे कमाईचे साधन काय? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले आहेत. तर आता गोविंदाच्या उत्पन्नाचे साधन काय? गोविंदा कसे कमावतो? हे जाणून घेऊया.
चित्रपटात काम करणारे कलाकार जेव्हा चित्रपटात काम करतात तेव्हा त्यांना खूप पैसे मिळतात. मात्र जेव्हा ते काम करणं बंद करतात तेव्हा मात्र त्यांच्या कमाईचा मार्ग बंद होतो. अशावेळी ते कसे कामावतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. गोविंदानेदेखील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. यामधून त्यांनी खूप कमाई केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाची संपत्ती आता तब्बल १६० कोटी रुपये आहे.
गोविंदाचे मुंबई शहरात तीन घरं असून अमेरिकेमध्येही संपत्ती आहे. तसेच रायगड येथे त्यांचे फार्महाऊस आहे. तसेच त्याचे स्वतःच्या मालकीचे हॉटेल असून इतर व्यवसायदेखील आहेत. यामधून त्याची तब्बल पांच कोटी रुपयांची कमाई होते. तसेच एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तो तब्बल पाच कोटी रुपये इतके शुल्क आकारतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची महिन्याची कमाई एक कोटी रुपये असून वर्षभराची कमाई १२ कोटी रुपये इतकी आहे. तसेच त्याने कोट्यावधी रुपयांची गुंतवणूकदेखील केली आहे.