शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री महिन्याभरानंतर भारतात परतताच एअरपोर्टवर पोहोचल्या मैत्रिणी, तिथेच नाचल्या अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 9, 2024 | 3:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nach Ga Ghuma Team Video

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री महिन्याभरानंतर भारतात परतताच एअरपोर्टवर पोहोचल्या मैत्रिणी, तिथेच नाचल्या अन्…; व्हिडीओ व्हायरल

बॉक्स ऑफिसवर सध्या मराठी चित्रपटांनी धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. अशातच सध्या नाच गं घुमा या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवर बरेच रेकॉर्ड मोडत या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सारंग साठे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. (Nach Ga Ghuma Team Video)

सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु असलेलंही पाहायला मिळत आहे. चित्रपटातील कलाकार मंडळी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. मात्र या प्रमोशनदरम्यान चित्रपटातील मुख्य अभिनेत्री मुक्ता बर्वे दिसली नाही. कारण मुक्ता तिच्या कामानिमित्त अमेरिका येथे गेली होती. आता मुक्ता अमेरिकेतून परतली असून तिच्या स्वागतासाठी ‘नाच गं घुमा’ची टीम एअरपोर्टवर पोहोचली आहे.

आणखी वाचा – अरुंधतीने संजनाला सुनावलं, मैत्रिणींसमोर आप्पांची माफी मागायला लावली अन्..; दोघींमध्ये मोठा वाद

View this post on Instagram

A post shared by नाच गं घुमा । मराठी चित्रपट (@naach_gaghuma)

“राणीताई महिनाभर अमेरिकेला होत्या, कामासाठी त्या तिकडे गेल्या होत्या. आज त्या परत येणार आहेत, आणि आम्ही त्यांना इथे घ्यायला आलो आहोत. त्यांना माहित नाही आहे. सरप्राइज की काय ते असतं ते आम्ही त्यांना देणार आहोत”, असं नम्रता संभेराव म्हणजेच चित्रपटातील आशाताई बोलताना दिसत आहे. यावर मुक्ता बोलतेय, “खूप मस्त. मी वेडी झाले. मी हे सगळं मिस करत आहे. आणि प्रमोशन सुरु आहे, सिनेमा हिट होत आहे आणि मी इथे नाही आहे. या दोघी आता समोर आल्या त्यांना पाहून खूप मस्त वाटलं”, असं बोलत मुक्ता थोडीशी भावुकही झालेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – सात वर्षांनी अप्पी-अर्जुनची भेट, मात्र लेकाला भेटण्यासाठी घातली अट, बाप-लेकामधील दुरावा कधी संपणार?

एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ ‘नाच गं घुमा’च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला असून त्याखाली कॅप्शन देत “आमची राणी गेला एक महिना भारताबाहेर होती. प्रमोशनदरम्यान आशाताईंनी आणि आम्ही सर्वांनीच तिला खूप मिस केलं. म्हणूनच ‘नाच गं घुमा’ टीम जाऊन पोहोचली एअरपोर्टवर राणीला म्हणजेच आपल्या लाडक्या मुक्ता बर्वेला सरप्राइज द्यायला. आमचं बॉण्डिंग, आमची मज्जा चित्रपटात नक्की बघा”, असं म्हटलं आहे.

Tags: marathi actressmukta barvenach ga ghumaNach Ga Ghuma Team Videonamrata sambherav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Kushal Badrike and Hemangi Kavi's 'Madness Machayenge' Hindi comedy show criticized by the audience.

“पांचटगिरी चालू आहे”, हेमांगी कवी व कुशल बद्रिकेच्या हिंदी कॉमेडी शोवर प्रेक्षकांची टीका, म्हणाले, “मराठी शोमधून...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.