कलाकार मंडळी म्हटलं की त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना विशेष आवडत. यासाठी कलाकार ही चाहत्यांच्या तितकेच संपर्कात असतात. ही कलाकार मंडळी चाहत्यांसोबत त्यांच्या वैयक्तिक जीवनातील घडामोडी कायमच सोशल मीडियावरून शेअर करत असतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकतीच चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. (Rasika Sunil New Car)
रसिकाने नुकतीच एक महागडी गाडी खरेदी केली असल्याची आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावरून शेअर केली आहे. महागड्या गाड्यांपैकी एक असलेली मर्सिडीझ बेन्झ जीएलए ही कर रसिकाने खरेदी केली आहे. यावेळचा एक व्हिडीओ रसिकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रसिकाने तिच्या वाढदिवसानिमित्त मर्सिडीज बेन्झ ही कार विकत घेतली आहे. या व्हिडीओमध्ये ती शोरुममधून कार घेताना दिसत आहे. तिने मर्सिडीज बेन्झ खरेदी केली असून या व्हिडीओमध्ये ती शोरुमध्ये एंट्री घेताना दिसते. नंतर ती व तिचे कुटुंबीय सगळ्या फॉरमॅलिटी पूर्ण करतात आणि त्यांना कारची डिलिव्हरी मिळते. या व्हिडीओत रसिका व तिचे कुटुंबीय प्रचंड आनंदी दिसत आहे.
पाहा रसिकाच्या आलिशान गाडीची किंमत (Rasika Sunil New Car)
रसिकाने खरेदी केलेल्या या महागड्या गाडीची किंमत ४८ ते ५२ लाख असल्याचं समोर आलं आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच रसिकाच्या चाहत्यांनाही या व्हिडिओवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रसिकाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवली. मात्र काही वैयक्तिक कारणामुळे तिने या मालिकेला अर्ध्यावरच रामराम ठोकला. त्यानंतर आता रसिका ‘डाएट लग्न’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

रसिका तिच्या अभिनयासोबतच विशेष चर्चेत असते ते म्हणजे तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. मध्यंतरी तर ती तिच्या किसिंग सीनमुळे चर्चेत होती. यावेळी तिला बरंच ट्रोलही कऱण्यात आलं, मात्र रसिकाने एका मुलाखतीत भाष्य केलं तेव्हा तिने असं म्हटलं की, “मी ट्रोलिंगकडे लक्षच देत नाही, सोशल मीडियावर अनेकदा नकारात्मक कमेंट्स येत असतात पण त्या पासून दूर राहण्यासाठी मी आता त्या वाचणचं बंद केलं आहे. मला तुमचं कौतुकही नको आणि टीकाही नको.”