बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान. आमिर खान हा त्याच्या अभिनयात परफेक्ट असला तरी त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल तो इमपरफेक्ट राहिला आहे. अभिनेता आमिर खान हा त्याच्या अभिनयाबरोबरच वैवाहिक आयुष्याबद्दलची चर्चेत राहत असतो. आमिर खानचा त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव बरोबर घटस्फोट झाला असला तरीही ते दोघे अनेकदा एकत्र दिसून येतात.
किरण राव आणि आमिर खान २०२२ मध्ये वेगळे झाले. पण दोघेही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात एकत्र दिसतात. इतकंच नाही तर आमिर व किरणमध्ये अनेकदा प्रेमही पाहायला मिळतं. त्यामुळे यांचा घटस्फोट झाला असला तरीदेखील दोघांना एकत्र पाहून अनेकांना त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न पडतात. दरम्यान, एका मुलाखतीत किरणने आमिर खानबरोबरच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
किरण राव तिच्या आगामी ‘लापता लेडीज’ या चित्रपटासंदर्भात मुलाखती देत असून नुकत्याच एका मुलाखतीत आमिर खानबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. ‘कनेक्ट एफएम कॅनडा’ला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत किरणने असं म्हटलं की. “हे सर्व नैसर्गिकरित्या झाले. कारण आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. मग जोडीदार झाल्यानंतरही आम्ही एकत्र काम करत राहिलो. वैवाहिक नात्याच्या पलीकडे जाऊन आम्ही एकमेकांना मित्र म्हणून समजून घेतो”.
यापुढे ती असं म्हणाली की, “आमच्यात कधीही मतभेद झाले नाहीत किंवा कधीही दुरावा आला नाही. आमचे नाते एक अतिशय कौटुंबिक व प्रामाणिक असून आमच्यात असं काहीतरी आहे जे कधीही नष्ट होऊ शकत नाही. आमच्यात कधीही मोठे भांडण झाले नाही. आम्हाला एक कुटुंब राहायचे म्हणून रहायचे होते”.