लोकप्रिय हिंदी टीव्ही शो ‘बिग बॉस १७’ दिवसागणिक खूप रंजक होत चालली आहे. शोच्या पहिल्या दिवसापासूनच घरातील सर्व स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं होत असल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे या शोमध्ये अनेक ट्विस्ट घडत असताना अंकिता लोखंडे-विकी जैन आणि नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा या रिअल लाईफ कपल्समध्येही कडाक्याचं भांडण होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र, या कपलच्या सततच्या भांडणांमुळे या जोडीचे चाहते खूप नाराज झाले असून ते कमेंट्सद्वारे आपली प्रतिक्रिया देत आहे. आता या प्रकरणावर एका अभिनेत्रीने आपलं मत व्यक्त केलं आहे. (Kamya Punjabi on Ankita Lokhande & Vicky Jain relationship)
‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद होत आहे. दोघांमधील या वादाचे परिणाम त्यांच्या नात्यावर होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. बिग बॉमधील या खेळाच्या नादात त्यांच्या नात्यावर काही विपरीत होऊ नये, असं त्यांच्या चाहत्यांना वाटतं. आता लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व शोची माजी स्पर्धक असलेली काम्या पंजाबी हिने अंकिता-विकीच्या बिग बॉसमधील सहभागाबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल चिंता व्यक्त केली.
हे देखील वाचा – चाहत्याला फटकावल्यानंतर नाना पाटेकरांचं स्पष्टीकरण, व्हायरल व्हिडीओ पाहून म्हणाले, “मी त्याला मारलं आणि…”
काम्याने तिच्या ट्विटर (आताचे X) अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, “खरं सांगू, मला अंकिता खूप आवडते. पण मला आज असं वाटतं की, तिने या शोमध्ये तिच्या नवऱ्याबरोबर सहभागी व्हायला नको होतं. मी आशा करते की, तिला व विकीला खूप उशीर होण्याआधीच हा खेळ समजला असेल.”
हे देखील वाचा – Video : सई ताम्हणकरच्या गाण्यावर थिरकला अरुण कदमांचा नातू, अभिनेत्रीही जोरजोरात हसू लागली अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
I really like Ankita but today i felt usko nahi aana chahiye tha iss show meh, definitely not with her husband! I hope she understand the game before its too late for her n vikki as well. #BB17 @ColorsTV
— Kamya Shalabh Dang (@iamkamyapunjabi) November 14, 2023
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादामुळे नुकतंच बिग बॉसने विकी जैनला दुसऱ्या घरात शिफ्ट केलं. ज्यामुळे अंकिता प्रचंड नाराज झाली होती. मात्र, विकीला यावेळी प्रचंड आनंद झाला होता. त्याचं हे वर्तन पाहून अंकिताला राग अनावर झाला आणि तिने पतीशी वाद घालण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, अंकिताने अश्या माणसाशी लग्न करून आपल्याला पश्चाताप झाल्याचं म्हटलं होतं.