नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील नानांच्या कृतीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बरं या कृतीमुळे नाना टीकेचे धनी बनले आहेत. या व्हिडिओमध्ये नानांनी एका इसमाला नानांनी जोरदार टपली मारल्याचे एका कॅमेऱ्यात कैद झाले अन् तो व्हिडिओ काहीच क्षणात सोशल मीडियावरून वाऱ्यासारखा पसरला. दरम्यान नानांचा एक चाहता त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी पुढे आला होता. नाना सीनदरम्यान चित्रीकरण करत असताना त्यांचा हा चाहता मध्येच आला आणि त्यांच्या बाजूला उभा राहून फोटो काढू लागला. त्यावेळी नानांना चाहत्यांचा प्रचंड राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात जोरदार टपली मारली. (Nana Patekar Apology)
हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान यावर नानांनी स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते स्पष्टीकरण देत माफी मागताना दिसत आहेत. या व्हिडिओत बोलताना नाना म्हणाले, “एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मी एका मुलाला मारतोय. हा सीन आमच्या चित्रपटाचा भाग आहे. आम्ही रिहर्सल करत असताना पाठीमागून एक जण म्हणतो ‘ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का?’ मी त्यात टोपी घालून असतो. तो येतो मी त्याला पकडून मारतो आणि ‘नीट वाग, उद्धट बोलू नकोस’ असे म्हणतो. त्यानंतर तो जातो”.
#WATCH | On a viral showing him slapping a boy for taking a selfie with him, actor Nana Patekar says, "A video is going viral where I have hit a boy. Though this sequence is a part of our film, we had one rehearsal…We were scheduled to have a second rehearsal. The director told… pic.twitter.com/CVgCainRg1
— ANI (@ANI) November 16, 2023
पुढे नाना म्हणाले, “एक रिहर्सल केली, नंतर दिग्दर्शकाने पुन्हा रिहर्सल करायला सांगितली. आम्ही सुरू करणार इतक्यात या व्हिडीओत दिसणारा मुलगा तिथे आला. मला माहीत नव्हते की हा मुलगा कोण आहे, मला वाटले आमच्या टीममधला आहे. त्यामुळे सीननुसार मी त्याला मारलं आणि माझा डायलॉग म्हटला. नंतर मला कळाले की हा आमच्या टीममधला माणूस नाही. मग मी त्याला बोलवायला जात होतो, पण तो पळून गेला. त्याच्या मित्राने वगैरे हा व्हिडीओ शूट केला असेल” असं नाना म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “मी कधीच कुणाला फोटोसाठी नाही म्हटलेले नाही. मी इथेही हजारो फोटो काढले, तिथे वाराणसीत घाटावर खूप गर्दी असते. हे चुकून झाले, मला माहीत नाही तो कुठून आला, मी आमच्या टीमचा माणूस समजून रिहर्सलचा सीन शूट केला. या व्हिडीओमुळे कोणताही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा, मी असे कधीच कुणाला मारत नाही, आजपर्यंत मी कधीच असे केलेले नाही. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे मी असे कृत्य कधीच करणार नाही.” असं म्हणत व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नानांनी स्पष्टीकरण देत माफी मागितली.