‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सर्वांच्या लाडक्या दादूसने स्वतःची अशी विशेष ओळख निर्माण केली. या कार्यक्रमातून अरुण कदम घराघरांत पोहोचले. काही महिन्यांपूर्वीच सर्वांचे लाडके दादूस यांनी आजोबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. अरुण कदम यांची लेक सुकन्या हिला पुत्रप्राप्ती झाली. १९ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी चिमुकल्याचा येण्याचा आनंद दादुसने व्यक्त केला होता. (Arun Kadam And Saie Tamhankar)
दिवाळी सणाचे औचित्य साधत काही दिवसांपूर्वीच अरुण कदम यांनी त्यांच्या नातवाचा चेहरा दाखवत खास फोटो शेअर केले होते. अरुण कदम यांनी नातवाच्या पहिल्याच दिवाळीला त्याचा चेहरा दाखवला. त्यांच्या नातवाचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत. यांत पहिल्या दिवाळीनिमित्त नातू अथांगला उटणं लावतानाचा फोटो तसेच सिद्धिविनायक मंदिरातील त्यांचे कुटुंबाबरोबरचे एकत्र फोटो शेअर केले होते.
यानंतर आता अरुण कदम यांच्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अरुण कदम यांचा हास्यजत्रेतील सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अरुण यांच्यासह सई ताम्हणकर पाहायला मिळतेय. या व्हिडिओत अरुण कदम सईला त्यांच्या नातवाचा म्हणजेच अथांगचा एक व्हिडीओ दाखवत आहेत. यांत अथांग गोड झोपलेला पाहायला मिळतोय आणि त्या व्हिडिओला त्यांनी “जपून जपून जारे, पुढे धोका आहे” हे गाणं लावलं आहे. सईच्या या गाण्यावेळी अथांग दचकतो. अथांगने दिलेली प्रतिक्रिया पाहून सईला हसू अनावर झालं. सई अरुण कदम यांच्या या क्रिएटीव्हीटीला पाहून ‘अशक्य आहात तुम्ही, अशक्य’ असं बोलताना दिसत आहे.
अरुण कदम व सईच्या या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. अरुण कदम यांनी नातवाचं पारंपरिक पद्धतीने बारसं पार पाडलं. या बारशाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. नातवाच्या बारशाला अनेक पाहुण्या-मंडळींसह, इंडस्ट्रीतील काही कलाकारही उपस्थित होते. अरुण कदम लेकीबरोबरचे अनेक फोटो नेहमीच शेअर करत असतात. सुकन्याच्या डोहाळ जेवणाचे तसेच तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचेही अनेक फोटोस त्यांनी शेअर केले होते.