शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्याने ५०वं शतक झळकावल्यानंतर अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, पोस्ट शेअर करत म्हणाली, “तू देवाचा…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 16, 2023 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anushka special post for virat on 50 century

Anushka special post for virat on 50 century

भारतात सध्या क्रिकेट विश्वचषकाचं वातावरण चांगलंच रंगत आलं आहे. भारतीय संघ आता अंतिम सामन्यात पोहोचला आहे. बुधवारी भारताचा न्यूझीलंड विरूद्ध धुवांधार सामना झाला. त्यात भारताने विजय संपादन करत अंतिम सामन्यात मजल मारली. या सामन्यात विराट कोहलीने ताबडतोड फलंदाजी करत त्यांच्या करिअरचं ५०वं शतक पूर्ण केलं. ‘मुंबई स्टेडियम’वर खेळला गेलेला हा सामना पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळीही उपस्थित होती. विराटच्या बायकोने म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मानेही हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली. विराटच्या या शतकी खेळीसाठी तिने एक खास पोस्ट लिहीत विराटचं कौतुक केलं तसेच तिने देवाचेही आभार मानले आहेत. (Anushka special post for virat on 50 century)

बुधवारी खेळला गेलेला सामना हा यावर्षीच्या विश्वचषकातील भारतासाठीचा खूप महत्त्वपूर्ण सामना होता. न्यूझीलंडने हा सामना जिंकण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण भारताने उत्तम खेळी करत हा सामना आपल्या नावावर केला. या सामन्यात विराटने आपल्या करीअरचं ५०वं शतक झळकवलं. हे शतक पूर्ण करून त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर यांचं रेकॉर्डही मोडलं. विराटने शतकाचं सेलिब्रेशन हटके अंदाजात केलं. यावेळी संपूर्ण भारतीयांसह त्याची पत्नी अनुष्का शर्माचाही आनंद गगनात मावेनासा होता. विराटने हा क्षण सेलिब्रेट करताना अनुष्काला मैदानातून फ्लाईंग किसही दिली.

आणखी वाचा – Video : …अन् ‘टायगर ३’ चित्रपट सुरु असतानाच थिएटरमध्येच प्रेक्षकांनी फोडले फटाके, पळापळ झाली आणि…; भयानक व्हिडीओ समोर

अनुष्का एक खास पोस्ट लिहीत विराटचं कौतुक केलं आणि देवाचे यासगळ्यासाठी आभार मानले. ती लिहीते, “देव हा एक सर्वोत्कृष्ट लेखक आहे! तुझ्या प्रेमाच्या रुपात मला आशीर्वाद देण्यासाठी, तुला सामर्थ्याकडे वाटचाल करताना पाहण्यासाठी तसेच तुझ्याकडे जे काही आहे आणि जे काही पुढे असेल ते साध्य करण्यासाठी, आणि तू स्वतःशी, खेळाशी प्रामाणिक राहण्यासाठी मी त्याचे खूप आभार मानते. तू खरोखरच देवाचा मुलगा आहेस”, असं लिहीत तिने विराटचा एक फोटो शेअर केला. ज्यात तो वर बघत आभार व्यक्त करताना दिसत आहे.   

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

आणखी वाचा – “दादा मला एक वहिनी आण…”, ओंकार भोजनेच्या लग्नाबाबत नम्रता संभेरावचं भाष्य, म्हणाली, “माझ्या भावाला…”

विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०वं शतक झळकवून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटने शतक ठोकल्यानंतर त्याने सचिनसमोर नतमस्तक होऊन मैदानातच त्याला नमस्कार केला. सचिनने विराटच्या शतकाबद्दल पोस्ट लिहीत अभिनंदनही केलं आहे. विराटची आजवरची ही खेळीच त्याला भारतातील सध्याचा एक सर्वोत्तम फलंदाज बनवते. संपूर्ण भारतातून त्यांच्या या खेळीचं कौतुक होत आहे.    

Tags: anushka sharmabollywood actressIndian cricketervirat kohali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Video : जंगलात रात्री असे शूट होत आहेत ‘सातव्या मुलीची...’मधील सीन, नेत्रा-इंद्राणी आगीमध्ये अडकल्या अन्...; व्हिडीओ व्हायरल | actress shweta mehendale shared satvya mulichi satvi goshta serial bts video on her social media

Video : जंगलात रात्री असे शूट होत आहेत ‘सातव्या मुलीची…’मधील सीन, नेत्रा-इंद्राणी आगीमध्ये अडकल्या अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.