अभिनेत्रीने फक्त अभिनयच करावा गाऊ नये किंवा गायकाने फक्त गाणंच गावं अभिनय करू नये असं कुठेही लिहिलेलं नाही. मराठी चित्रपट सृष्टीत असे अनेक गायक आहेत जे पडद्यावर देखील दिसले आहेत तर अनेक अभिनेत्री , अभिनेते आहेत जे सुंदर गातात, वादन करतात..(Jui Gadkari New Song Reel)
हे देखील वाचा- रंजना चित्रपटात नम्रताची वर्णी?,चाहत्यांच्या कमेंटने वेधलं लक्ष
मालिका विश्वात सध्या चर्चेत असलेल्या अशा दोन अभिनेत्रींनी एक सुंदर गाणं गात त्याच रील प्रेक्षकांसोबत शेअर केलं आहे. सुंदर अभिनय असणाऱ्या आणि सुंदर गाणं देखील गाणाऱ्या या अभिनेत्रींचं नाव आहे जुई गडकरी आणि मोनिका दबडे. सध्या स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ठरणाऱ्या ठरलं तर मग या मालिकेमधून या दोघी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. जुई गडकरी बऱ्याच कालावधीनंतर मालिकेत दिसत असून या मालिकेतील तीच काम प्रेक्षकांना अजूनही पसंत पडत आहे आणि प्रेक्षकांच्या पसंतीमुळे ही मालिका TRP ची शर्यतीत अव्वल ठरली आहे..(Jui Gadkari New Song Reel)
हे देखील वाचा- ‘सई ताम्हणकरला टक्कर देते तु..’ प्राजक्ताच्या फोटोशूटवर चाहत्याची कमेंट
जुई ने शेअर केलेल्या रीलमध्ये त्या दोघीने आई बापाची लाडाची लेक हे गाणं गायलं आहे. या रीलवर प्रेक्षकांनी ही सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका मुलीचं आई वडिलांशी असलेलं नातं जेवढं सुंदर असत तेवढच सुंदर आवाजात या दोघीनीं हे गाणं गायल्याच आहे. जुईने या आधी गायलेलं मालिकेचं टायटल सॉंगही तुफान गाजलं होत.
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी मागील दोन ते तीन वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर राहिली होती. तिने ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. या शिवाय ‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.