अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. तिने मालिका, चित्रपट, वेबसीरिज यात वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकल. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या सर्वच फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.(Prajakta Mali Photoshoot)
आपल्या मनमोहक अदाकारीने प्राजक्ताने चाहत्यांच्या मनात घर केलेच आहे. प्राजक्ता तिचे साडीतील फोटो पोस्ट करून नेहमीच चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. या साडीतील फोटोंमध्ये प्राजक्ताचा लूक सुंदर दिसतोच मात्र तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या कलरफुल ड्रेसमधल्या फोटोंनी साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातलीच आहे दरम्यान प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोंखालील कमेंट्सने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
पहा काय केलीय चाहत्याने कमेंट (Prajakta Mali Photoshoot)

प्राजक्ताने पोस्ट केलेल्या या फोटो आणि कॅप्शनवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने सई ताम्हणकरला टक्कर देते तु… असे लिहिले आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरही तिच्या दिलखेचक फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. कलरफुल ड्रेस मधले तिचे फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. तर आता प्राजक्ता माळीनेही हटके अंदाजात फोटोशूट केल्याने सईला टक्कर देतेय अशी कमेंट चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्या युजरने White dress var painting keliy ka? अशी मजेशीर कमेंट ही केली आहे. तर बऱ्याच चाहत्यांनी प्राजक्ताच्या या फोटोजना हार्ट ईमोजी शेअर करत पसंती दर्शिवलीय. (Prajakta Mali Photoshoot)
हे देखील वाचा – ‘मोठ्या आजारपणातून बाहेर पडताना..’ म्हणत जुईची ती पोस्ट चर्चेत
प्राजक्ता माळी अभिनेत्री तर आहेच मात्र ती व्यावसायिक सुद्धा आहे. तिने पारंपारिक दागिन्याचा व्यवसाय सुरू केला असून प्राजक्ताराज असं तिच्या व्यवसायाचं नाव आहे. विशेष म्हणजे तिच्या या दगिनाच्या व्यवसायाला देखील चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. यासोबत प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसून येते.
