महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम म्हटलं की कॉमेडी क्वीन नम्रता हिचं नाव चाहत्यांच्या तोंडी येतंच.विनोदी अभिनेत्री म्हणून तिने कलाक्षेत्रात एक स्वतःचं स्थान निर्माण केलं. ती तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवते. तिचे चाहते महाराष्ट्राच्या घराघरात आहेत. ती कधी लॉली बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साधी आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे प्रसिद्धी मिळाली असली तरी तिने अनेक नाटकांमध्ये देखील विविध भूमिका साकारल्या आहेत. ही नाटकं हाऊसफुल ठरली आहेत. नम्रता शो असो किंवा नाटक कुठेही प्रेक्षकांना हसवण्यासाठी जीवतोड मेहनत घेते. यासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे.नुकतंच एका पुरस्कार सोहळ्यातील लूक पाहून एका चाहत्याने तिला खास कॉम्प्लिमेंट दिली.(Ranjana Deshmukh )
चाहता काय म्हणाला नम्रताला?
नम्रताने झी नाट्य गौरव पुरस्काराला नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी तिने पिंक काठ असलेली पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्यावर सिल्व्हर दागिने घातलेत तर तिच्या केसातील फुलाने तर तिच्या लूकची शोभा वाढवली. ती या लूकमध्ये सुंदर दिसते. तर तिच्या या लूकमधील फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा लूकने अनेक चाहते घायाळ झालेत पण एका चाहत्यांच्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधलं. तिचा हा लूक पाहून चाहत्याने एका व्हिडिओवर तू मला सेम रंजना देशमुख सारखी दिसते,तू हे काम खरंच मस्त करशील असं म्हटलंय. तर अनेक चाहत्यांनी हार्ट,फायर इमोजी शेअर करत कमेंटचा पाऊस पाडलाय.
हे देखील वाचा- गौरीच्या आठवणीत हरवलेल्या यशचा अपघात? आई कुठे काय करते मालिकेत येणार नवीन वळण?
नम्रता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो सोबतच ती मराठी चित्रपटात देखील पाहायला मिळते. यासोबतच तीने तिच्या अभिनयाची झलक रंगभूमीवर देखील दाखवली आहे. कुर्रर्रर्र नाटकातील तिची भूमिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.(Ranjana Deshmukh )
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीत रंजना देशमुख यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. त्यांनी अगदी ब्लॅक अँड व्हाइटचा जमानाही रंगीन केला होता.भुरळ घालणारा देखणा चेहरा, विनोदाचं टायमिंग, तेवढ्याच ताकदीची गंभीर भूमिका, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवला.यांच्या जीवनप्रवासावर लवकरच रंजना अनफोल्ड स्टोरी असा चित्रपट येतोय. तर या चित्रपटात नम्रता संभेराव ही रंजना देशमुख यांची भूमिका साकारणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.