‘आई कुठे काय करते’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. मालिकेच्या कथानका सोबतच मालिकेतील कलाकारांवर देखील चाहते भरभरून प्रेम करतात. मालिकेच्या नव्या कथानकानुसार अरुंधतीचा नव्याने सुरु झालेला संसार प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडताना दिसतोय. तर दुसरीकडे अरुंधतीच्या मुलांच्या म्हणजे यश, ईशा आणि अभिच्या आयुष्यात खूप विघ्न आलेली दिसून येतात.(Anirudh Reacted on Esha Relationship)
एकीकडे यशच्या आयुष्यात गौरी निघून गेल्याने तो खचला आहे. तर दुसरीकडे ईशा पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेते. अशी अनेक संकट सध्या अरुंधतीच्या पुढे आलेली दिसत आहेत. सर्व संकटांसोबतच अनिरुद्ध ही तिला मिळेल तेव्हा टोमणा देत तिच्यासोबत वाद घालताना दिसतो. अरुंधतीला त्रास दिल्यानंतर आता अनिरुद्धला वादाचा नवीन मुद्दा मिळाल्याचं दिसत आहे. ईशा आणि अनिशच्या नात्याबद्दल अनिरुद्धला समजलं आहे.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/04/ITS-MAJJA-CONTENT-1920-×-1024-px-18-1024x546.png)
हे देखील वाचा- मालिकेचं टायटल गायल्या नंतर जुईचं आणखी एक गाणं व्हायरल मोनिकाने ही दिली साथ
अनिरुद्धचा वादाचा नवा मुद्दा(Anirudh Reacted on Esha Relationship)
मालिकेत एकीकडे यश हा गौरीच्या आठवणीत रमत भावुक झाला. यामुळे अरुंधती आणि घरचे सर्वजण त्याला धीर देत आहेत. अरुंधतीला यशवर मोठं संकट ओढवलं याचा भास देखील होतो, म्हणून ती घाबरते. त्यावेळी ती यशला कॉल करत असते. त्याचा फोन बंद असल्यामुळे आशुतोष अरुंधती यशाचा शोध घेतात. रस्त्यात त्यांना एका तरुणाचा ऍक्सीडेन्ट झाला आहे असं समजत. पण तो यश नसतो. यश घरी सुखरूप असतो. हे तो अरुंधतीला कॉल करून सांगतो. एकीकडे मुलाला काही झालं नाही हे ऐकून तिला बरं वाटत,तर दुसरीकडे ईशा-अनीशच्या नात्याची तिला भीती वाटते.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/04/ITS-MAJJA-CONTENT-1920-×-1024-px-24-1024x546.png)
अनिरुद्ध हे नातं कधीच मान्य करणार नाही हे अरुंधती ईशाला वारंवार सांगते. ईशा अनिशसोबत पळून जाण्याचा निर्णय घेते, पण अनिश समजावतो आणि ती निर्णय बदलते. तर आता त्यांच्या नात्याबाबदल ईशा स्वतः आनिरुद्धला सांगते. नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध देशमुखांच्या घराबाहेर ईशा अनीशला एकत्र बघतो. तेव्हा अनिरुध्दचा राग अनावर होतो. तो अनिशवर हात उचलतो,अनिश अनिरुद्धच्या रोखतो तेव्हा ईशा अनिरुद्धाला,”अनिशचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं देखील अनिशवर प्रेम आहे” असं सांगते. तर आता अनिरुद्ध यावर काय प्रतिक्रिया देणार? अनिरुद्ध अनिष आणि इशाच्या लग्नाला मान्यता देणार का? यशच पुढे काय होणार? या सगळ्या घटना पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहेत.(Anirudh Reacted on Esha Relationship)
हे देखील वाचा- ‘..म्हणून अशोक सराफ यांनी त्यांच्या मुलाशी धरला होता अबोला’