शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट पाहण्यासाठी ‘या’ शहरांमध्ये ऑफिस कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, तिकिटेही मिळाली फ्री

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 10, 2023 | 9:37 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Offices in Chennai & Bengaluru declare Holiday on Rajnikanth's Jailer movie release Day

रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट पाहण्यासाठी 'या' शहरांमध्ये ऑफिस कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, तिकिटेही मिळाली फ्री

दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते रजनीकांतचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड आतुरलेले आहेत. अभिनेते रजनीकांत ६ दशकांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिली आहे. त्यामुळे त्यांना सुपरस्टार अशी उपमा दिली गेली आहे. तर दक्षिणेत त्यांची जबरदस्त क्रेझ असून चाहत्यांकडून त्यांना ‘थलायवा’ ही पदवीदेखील देण्यात आली आहे. (Jailer Movie)

‘जेलर’ चित्रपटाच्या निमित्ताने सुपरस्टार रजनीकांत तब्बल २ वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहेत. आता रजनीकांतचा चित्रपट म्हटला, की चाहते त्यांना पाहण्यासाठी नेहमीच आतूरलेले असतात. अशातच बंगळुरू आणि चेन्नईच्या काही कंपन्यांनी रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.

हे देखील वाचा – “चित्रपटसृष्टीचा संपूर्ण इतिहास फक्त मलाच माहिती”, आशा भोसलेंचं मोठं विधान, म्हणाल्या, “प्रत्येकाच्या आयुष्याबाबत…”

View this post on Instagram

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

हे देखील वाचा – “चित्रपट कसा बनवायचा हे तो मला शिकवणार का?” रणदीप हुड्डा व महेश मांजरेकरांमध्ये वाद, म्हणाले, “त्याचं बोलणं…”

दक्षिण भारतात जेव्हा रजनीकांत यांचा चित्रपट येतो. तेव्हा चाहते मोठ्या जल्लोषात त्यांच्या चित्रपटाचे स्वागत करतात. एकीकडे त्यांचा चित्रपट प्रदर्शित होत असताना बंगळूरू आणि चेन्नईमधील काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘जेलर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. तर, काही आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत तिकिटेही वाटली आहेत. शिवाय अन्य राज्येदेखील रजनीकांतच्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहेत. (Offices in Chennai & Bengaluru declare Holiday on Rajnikanth’s Jailer movie release Day)

हे देखील वाचा – आमिर खानची लेक लवकरच होणार पुण्याची सून, लग्नाची तारीखही ठरली, शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरु

रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट आज चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रजनीकांत एका जेलरच्या भूमिकेत दिसणार असून थलायवाचा हा नवा अवतार पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. चित्रपटात रजनीकांतसह मोहनलाल, जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार, तमन्ना, राम्या कृष्णन व अन्य कलाकार दिसणार आहेत.

Tags: jailer movierajnikanthsouth movies
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mumbai Police On Baipan Bhari Deva

Mumbai Police On Baipan Bhari Deva: सचिन तेंडुलकर नंतर मुंबई पोलिसांनीही पाहिला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट, म्हणाले, “जेव्हा महिला पोलिस स्टेशनला येतील तेव्हा…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.