रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चित्रपटसृष्टीचा संपूर्ण इतिहास फक्त मलाच माहिती”, आशा भोसलेंचं मोठं विधान, म्हणाल्या, “प्रत्येकाच्या आयुष्याबाबत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 9, 2023 | 2:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
asha bhoshle allegations on Bollywood

“चित्रपटसृष्टीचा संपूर्ण इतिहास फक्त मलाच माहिती”, आशा भोसलेंचं मोठं विधान, म्हणाल्या, “प्रत्येकाच्या आयुष्याबाबत...”

जगभरातील सुप्रसिद्ध गायकांच्या यादीमध्ये आशा भोसले यांचं नाव आदराने घेतलं जातं. आशा भोसले यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान मोठं आहे. आजही त्यांनी गायलेली गाणी ऐकली की, एक वेगळाच आनंद मिळतो. सातासमुद्रापलिकडे त्यांचा चाहतावर्ग आहे. आशा भोसले सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. दुबईमध्ये त्यांचं एक कॉन्सर्ट होणार आहे. याचसंदर्भात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेलं भाष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आशा भोसले यांच्याकडे पाहिलं की, एक नवी उर्जा मिळते. या वयातही त्या परदेशात कॉन्सर्ट करत आहे. त्यांची काम करण्याची इच्छा व कलेप्रती असणारं प्रेम खरंच कौतुकास्पद आहे. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आशा भोसले अगदी भरभरुन बोलत होत्या. यावेळी त्यांनी चित्रपसृष्टीबाबत काही विधाने केली. याचीच चर्चा रंगत आहे.

आणखी वाचा – “आनंद दिघेंच्या नावावर सहानुभूती…” ‘धर्मवीर २’बाबत प्रसाद ओकने पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले, “एकनाथ शिंदे पुन्हा…”

चित्रपटसृष्टीमधील अनुभवाबाबत आशा भोसले बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, “वयाच्या १०व्या वर्षापासून मी गाणं गात आहे. १९४६ पासून मी मुंबईमध्ये हिंदी गाणी गाण्यास सुरुवात केली. सगळ्या गोष्टी मला आठवत असतात. जुने लोक, कलाकार, संगीत दिग्दर्शक यांच्या आठवणी माझ्या मनात आहेत”.

आणखी वाचा – “आई-वडिलांचा घटस्फोट झाला अन्…”, आमिर खानच्या लेकीचा आजारपणाबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या आजारासाठी ”

View this post on Instagram

A post shared by Mangeshkars – The 5️⃣ Jewels ???? (@the_mangeshkars)

“चित्रपटसृष्टीचा संपूर्ण इतिहास आज फक्त मलाच माहित आहे. सगळ्यांच्या आयुष्याबाबतही मला माहिती आहे. दिग्दर्शक, कलाकार, गायक या सगळ्यांबाबत माहिती माझ्याकडे आहे. याबाबत जर मी बोलायला लागले तर तीन ते चार दिवस लागतील. इतक्या गोष्टी माझ्याकडे आहेत. प्रत्येक गोष्ट माझ्या मनात आहे. मी कोणतीच गोष्ट विसरलेले नाही. मी या चित्रपटसृष्टीची शेवटची मुघल आहे”. आशा भोसले यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tags: asha bhoslebollywood newsentertainment newsentertainment update
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Kangana Ranaut Vs Javed Akhtar

कंगना रनौत व जावेद अख्तर यांच्यामधील वाद पेटला, कोर्टाने मागितलं अभिनेत्रीकडे उत्तर, केले होते गंभीर आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.