आमिर खानच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. आमिरची लेक इरा खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच इराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा झाला. साखरपुड्याचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इरा व नुपूर एकमेकांवर असलेलं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलेपणाने व्यक्त करताना दिसतात. साखरपुड्याच्या काही महिन्यांनंतर त्यांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. इरानेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. (Ira Khan Reveals Her Wedding Date)
इरा व नुपूर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. नुपूर मुळचा पुण्याचा आहे. नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. इतकंच नव्हे तर त्याने आमिरलाही ट्रेन केलं आहे. साखरपुड्यापूर्वी नुपूरने इराला प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती. कुटुंबियांच्या सहमतीने दोघांनी आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. आता लग्नासाठी इरा व नुपूर जोरदार प्लॅनिंग करत आहेत.
वाचा – काय आहे इराच्या लग्नाची तारीख ? (Ira Khan Reveals Her Wedding Date)
एका मुलाखतीत इराला तिच्या लग्नाबाबत विचारलं असता तिने यावर भाष्य केलं. तसेच लग्न कोणत्या तारखेला असणार हेही सांगितलं. मात्र कोणत्या वर्षी दोघं लग्न करणार हे तिने सांगितलेलं नाही. इरा म्हणाली, “मला व नुपूरला ३ जानेवारीला लग्न करायचं आहे”. ३ जानेवारीच लग्नाची तारीख का? याबाबतही इराने सांगितलं.
ती पुढे म्हणाली, “आमच्यासाठी ३ जानेवारी ही तारीख खूप खास आहे. कारण यादिवशी आम्ही एकामेकांना पहिल्यांदा किस केलं होतं”. इरा व नुपूर नेमकं कुठे लग्न करणार? हेही गुलदस्त्यातच आहे. या दोघांचा साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला होता. कुटुंबियांसह बॉलिवूडमधील काही मंडळींनी या सोहळयाला हजेरी लावली होती. आता लग्नही तितकंच थाटामाटात होणार असल्याचं चित्र दिसत आहे.