शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरचा तुरुंगातूनही त्रास, अभिनेत्रीने घेतली दिल्ली पोलिसांत धाव, म्हणाली, “तो मला…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 13, 2024 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Jacqueliene Fernandez has been harassed by Sukesh Chandrasekhar from jail the actress wrote a letter to complain see the details

जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरचा तुरुंगातूनही त्रास, अभिनेत्रीने घेतली दिल्ली पोलिसांत धाव, म्हणाली, “तो मला...”

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर विरोधात दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तुरुंगात असूनही सुकेश तिला सतत त्रास देत असून धमक्या देत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. सुकेश मंडोळी हा सध्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग आरोपाखाली तुरुंगात आहे. अभिनेत्रींना सतत पत्र लिहून तो आपल्या भावना व्यक्त करत असतो आणि कदाचित यामुळे कंटाळून जॅकलिनने आता तक्रार दाखल केली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, जॅकलिनने नुकतेच पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात तिने साक्षीदारांचे संरक्षण करण्यात यंत्रणेच्या अपयशाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. पोलिस आयुक्तांणा केलेल्या तक्रारीत जॅकलिनने तिच्या सुरक्षेसाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

View this post on Instagram

A post shared by Jacqueliene Fernandez (@jacquelienefernandez)

आणखी वाचा – राहुल वैद्य व दिशा परमारने पहिल्यांदा दाखवली लाडक्या लेकीची खास झलक, नेटकरी म्हणाले, “कार्बन कॉपी…”

या पत्रात जॅकलिनने असं म्हटलं आहे की, “मी एक जबाबदार नागरिक आहे. सुकेशनं यापूर्वी मला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. सुकेश हा जेलमध्ये असूनही मला कसा काय त्रास देऊ शकतो?”. तसेच ती एक जबाबदार नागरिकही असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. पण सध्या ती अशा एका प्रकरणात अडकली असून भविष्यात तिला याचे घातक परिणाम भोगावे लागणार असल्याचेही म्हटले आहे.

आणखी वाचा – मिथुन चक्रवर्तींना डिस्चार्ज, उद्यापासून करणार कामालाही सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली तब्येतीची चौकशी अन्…

दरम्यान, सुकेश हा मानसिक छळ करत असून तिला धमकावत आहे. पण तो तिला तुरुंगातून कसा संवाद साधत आहे, याविषयी तिला प्रश्न पडला आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने कारवाई करावी असे मत तिने या पत्राद्वारे मांडले आहे.

Tags: bollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsJacqueline FernandezMoney Laundering CaseSukesh Chandrasekharजॅकलिन फर्नांडिसबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनी लौंड्रिंग प्रकरणमनोरंजन बातमीसुकेश चंद्रशेखर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Dalljiet Kaur On Her Wedding

नवऱ्याने मारलं, सासरची मंडळीही नाराज अन् घटस्फोट; ११ महिन्यांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्नही मोडलं?, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.