गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मिथुन चक्रवर्तींना डिस्चार्ज, उद्यापासून करणार कामालाही सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली तब्येतीची चौकशी अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 13, 2024 | 10:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mithun Chakraborty discharged

मिथुन चक्रवर्तींना डिस्चार्ज, उद्यापासून करणार कामालाही सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली तब्येतीची चौकशी अन्…

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत दुखू लागल्याने शनिवारी कोलकाता येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मिथुन यांच्या तब्येतीबाबतची एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिथुन यांच्यावरील उपचार पूर्ण झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या ताज्या अपडेटनुसार मिथुन यांना काल सोमवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. आता ते पूर्णतः ठीक आहेत आणि त्यांच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग पुन्हा सुरू करणार आहेत, ही बातमी समोर आली आहे. (Mithun Chakraborty discharged)

मिथुन यांची तब्येत पूर्णतः ठीक असल्याचं समोर येताच अभिनेत्याला आता डिस्चार्ज देण्यात आल्याचे समोर आले आहे. ७३ वर्षीय मिथुन यांच्या १० फेब्रुवारी रोजी छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत बोलताना अभिनेत्याने असेही म्हटले होते की, “खरं तर कोणतीही समस्या नाही, मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. बघूया. मी लवकरच कामाला लागेन, कदाचित उद्यापासूनच मी कामाला सुरुवात करेन”, असं ते म्हणाले.

आणखी वाचा – रोमँटिक सीन करताना मनिषा कोइरालाच्या तोंडाचा घाणेरडा वास आला अन्…; बॉबी देओलचं वक्तव्य चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

मिथुन यांनी खुलासा करत असेही सांगितले की, रविवारी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता आणि तब्येतीची काळजी न घेतल्याबद्दल त्यांना फटकारले असल्याचंही सांगितलं. यापूर्वी, हॉस्पिटलने अधिकृत निवेदनात असे नमूद केले होते की, मिथुन यांना मेंदूचा इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर अपघात (स्ट्रोक) झाला आहे. अनेक ज्येष्ठ डॉक्टर व थेरपिस्ट यांनी ज्येष्ठ अभिनेत्याच्या प्रकृतीचा आढावा घेतला. सध्या ते पूर्णपणे ठीक झाले असून सुस्थितीत आहेत. डिस्चार्ज होण्यापूर्वी त्याच्या काही तपासण्या केल्या गेल्याचंही यावेळी सांगितलं.

आणखी वाचा – राहुल वैद्य व दिशा परमारने पहिल्यांदा दाखवली लाडक्या लेकीची खास झलक, नेटकरी म्हणाले, “कार्बन कॉपी…”

रविवारी हॉस्पिटलमधून त्यांचा पहिला व्हिडीओदेखील समोर आला होता. या व्हिडीओमध्ये मिथुन चक्रवर्ती डॉक्टरांशी बोलताना दिसले. पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख सुकांत मजुमदार व माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली त्यांना भेटायला आले होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मिथुन हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले पाहायला मिळाले.

Tags: entertainmentMithun ChakrabortyMithun Chakraborty dischargedMithun Chakraborty HealtHMithun Chakraborty Health Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Jacqueliene Fernandez has been harassed by Sukesh Chandrasekhar from jail the actress wrote a letter to complain see the details

जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरचा तुरुंगातूनही त्रास, अभिनेत्रीने घेतली दिल्ली पोलिसांत धाव, म्हणाली, “तो मला…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.