मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 7, 2025 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Deepshikha Ngpal ready to marry after divorce

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी...

कलाकारांचे लग्न, घटस्फोट आणि त्यासंदर्भात रंगणाऱ्या चर्चा बी-टाऊनला काही नव्या नाहीत. सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपशिखा नागपालही या चर्चांच्या भोवऱ्यात अडकली. तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला, संसारही थाटला. पण दीपशिखाचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं. तिचा दोनवेळा घटस्फोट झाला. त्यानंतर दीपशिखाच्या खासगी आयुष्याबाबत अनेक चर्चा रंगल्या. आता वयाची ४५शी ओलांडल्यानंतरही तिला लग्न करण्याची इच्छा आहे. याचबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपशिखाने भाष्य केलं. दीपशिखा आता नव्या जोडीदाराच्या शोधात आहे. (Deepshikha Ngpal ready to marry after divorce)

दीपशिखा म्हणाली, “मी तीनवेळा, चारवेळा लग्न करु शकते. मला यामध्ये काहीच लाज वाटत नाही. माझं आयुष्य मी जगत आहे. दोन लोक एकत्र राहत ज्यांचं अजिबात पटत नाही हे मी माझ्या डोळ्यांनी बघते. मी नेहमीच चुकीच्या कारणांमुळे लग्न केलं. योग्य कारण लक्षात ठेवूनच तुम्हाला लग्न केलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कारणासाठी आपण फक्त मुलांनाच दोष देऊ शकत नाही. मला असं वाटतं की, मी खूप रोमँटिक आहे. मी प्रेम, रोमान्स लग्न यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. ज्यामुळे दोन व्यक्ती एकत्र राहू शकतात. पण हा विश्वासच नसेल तर वैयक्तिक जीवन एकट्याने जगणं उत्तम आहे. तुम्ही तुमचं आयुष्य जगा”.

आणखी वाचा – १४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

View this post on Instagram

A post shared by Dipshikkha Nagppal (@deepshikha.nagpal)

दीपशिखाचा पहिला घटस्फोट झाला. त्यानंतर तिने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांचा संसार थाटल्यानंतरही तिचं हे नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं. पण यानंतर दीपशिखाला मोठा धक्का बसला होता. ती डिप्रेशनमध्ये होती. दीपशिखा म्हणाली, “सगळ्यातून बाहेर पडायला मला मला पाच ते सहा वर्ष लागली. स्वतःचाच गुन्हा आहे की काय असं मला सतत वाटत होतं. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, असं वागणं बदललं पाहिजे”.

आणखी वाचा – धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

पुढे ती म्हणाली, “बौद्ध जीवन जगायचं कसं? ही कला मी आत्मसात केली. नव नवीन गोष्टी मी शोधायला लागले. स्वतःच अभ्यास केल्यानंतर माझ्याबरोबरच अशा गोष्टी का घडत होत्या? हे लक्षात आलं. मी माझी उर्जा आणि दर्जा वाढवला आहे. कारण मी पुन्हा चुकीच्या मार्गांची यामधून निवड करणार नाही. मी आता स्वतःवर काम केलं आहे. सात वर्षांपासून मी एकटीच आहे. पण हे देवा माझं कोणीच नाही असं मी कधीच केलं नाही. योग्य ती व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल. आता मला काय हवं आहे हे कळालं आहे”. २००७मध्ये जीत उपेंद्रसह दीपशिखाचा पहिला घटस्फोट झाला. त्यानंतर २०१२मध्ये तिने केशव अरोराबरोबर लग्न केलं. २०१६मध्ये त्याच्याबरोबरही दीपशिखाचा घटस्फोट झाला. आता ती नव्या जोडीदाराच्या प्रतिक्षेत आहे.

Tags: bollywood actressbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Covid 19 Video

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.