‘आयपीएल’ची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएलमधील प्रत्येक गोष्ट खास असते. या सामन्यांमध्ये क्रिकेटपट्टूंच्या बाबतीत विविध गोष्टी घडताना दिसतात. असंच काहीसं क्रिकेटपट्टू हार्दिक पांड्याबरोबर घडलं. रविवारी (२४ मार्च) झालेल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सचा सहा धावांनी पराभव झाला. हार्दिकने मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून प्रतिनिधित्व केलं. पण सामना पराभूत झाल्यानंतर त्याच्याबाबत जे काही घडलं त्याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. क्रिकेटप्रेमींनी हार्दिकचा भर मैदानात अपमान केला.
हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून जाहिर करण्यात आलं. तिथपासूनच चाहत्यांची त्याला नापसंती होती. रविवारी सामन्यादरम्यान असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. मॅच सुरु असताना रोहित शर्माच्या नावानेच चाहते हाक मारत होते. हार्दिक कॅप्टन म्हणून पटला नसल्याचं यावेळी गणित दिसलं. मात्र चाहत्यांची त्याच्याप्रती केलेली कृती पूर्णपणे चुकीची होती. हार्दिकला काही लोक ‘छपरी छपरी’ म्हणून ओरडू लागले. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
They called hardik pandya chhapri on his face ???? this is unreal humiliation #chapri #hardikpandyahttps://t.co/w0gmFhzgFe
— VIVEK ( #???????? ???????? ???????????????????????????? ) (@UniquePullShot) March 25, 2024
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन म्हणून हार्दिकची पहिलीच मॅच होती. मात्र त्याच्या हाती निराशा आली. मैदानाताच त्याला चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र या संपूर्ण प्रकाराकडे हार्दिकने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ‘छपरी छपरी’ शब्द त्याच्या कानी पडला. मात्र त्याने याकडे कानाडोळा केला. हार्दिकला ट्रोल केलं तसेच अपयशामुळे निराश झालेला पाहून त्याची पत्नी नताशालाही वाईट वाटत होतं.
हार्दिक मॅच संपल्यानंतर ड्रेसिंग रुमकडे जात असताना हा संपूर्ण प्रकार घडला. आयपीएलच्या इतिहासामध्ये फार कमी वेळा अशाप्रकारचं चित्र पाहायला मिळतं. चाहत्यांकडून होत असलेला तिरस्कार पाहून यावर त्याने सध्या तरी बोलणं टाळलं आहे. मात्र झालेल्या गैरप्रकाराबाबत अनेकांनी सोशल मीडियाद्वारे हार्दिकची बाजूही घेतली आहे. मात्र त्याचा भर स्टेडियममध्ये अपमान झाल्यामुळे आता तो यावर उत्तर देणार का? हे पाहावं लागेल.