मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : RCBच्या विजयानंतर मैदानातूनच बायको, मुलांना विराट कोहलीचा व्हिडीओ कॉल, ‘तो’ क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हिडीओ व्हायरल

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 26, 2024 | 3:13 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Virat Kohli Viral Video Call With Anushka

Virat Kohli Viral Video Call With Anushka

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे क्रिकेट विश्वातील सर्वात रोमांचकारी क्रिकेट लीग म्हणजेच IPLची. क्रिकेटच्या सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये IPLचा समावेश होतो. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर, चेन्नई सुपर किंग्स यांच्यासह आणखी काही संघ या स्पर्धेत सहभागी होतात. क्रिकेट विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे विराट कोहली. रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर या संघातील महत्वाचा आणि लाखोंचा चाहतावर्ग असणारा विराट आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतीच रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर व किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात विराटने अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. (Virat Kohli Viral Video Call With Anushka)

संघाला दमदार विजय मिळवून दिल्यानंतर मैदानातील विराटचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विराट आपल्या कुटुंबासह व्हिडीओ कॉलद्वारे बोलताना दिसतोय. या पूर्वीही एका सामन्यानंतर विराट-अनुष्का यांच्यातील संभाषण व्हायरल झालं होतं. काही दिवसांपूर्वीच विराट-अनुष्काच्या घरी लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं. विराट-अनुष्काने आपल्या मुलाचं अकाय असं नामकरण देखील केलं. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये विराट अकायला पाहून आनंदीत झाल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर विराट- अकायमधील हे प्रेमळ संभाषण चांगलंच व्हायरल होतंय.

View this post on Instagram

A post shared by Cricket Addictor (@cricaddictor)


आणखी वाचा- मुलाच्या मृत्यूनंतर घटस्फोट, १२ वर्षांनी लहान मुलीशी केलं दुसरं लग्न अन्…; प्रकाश राज यांचा वाईट काळ आणि…

अकायसह विराट-अनुष्काला एक मुलगी देखील आहे. तिच्याबरोबरचे फोटोज, व्हिडीओज विराट-अनुष्का सोशल मिडियावर नेहमी शेअर करताना दिसतात. बॅंगलोर-पंजाब या संघांमध्ये रंगलेली ही मॅच चर्चेत राहिली ती म्हणजे विराटच्या ७७ रणांच्या दमदार खेळीमुळे. येणाऱ्या आगामी सामन्यांमध्ये विराट आणखी दमदार खेळी करणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक दिसत आहेत. (Virat Kohli Viral Video Call With Anushka)

आणखी वाचा- लग्नानंतरच्या पहिल्या होळीला सासरवाडीमध्ये पोहोचला पियुष रानडे, सासूबाईंचा जावयासाठी पुरणपोळीचा बेत अन्…; व्हिडीओ व्हायरल

तत्पूर्वी प्रेक्षकांमध्ये बॅंगलोर-चेन्नई या मॅचची उत्सुकता शिगेला पोहचलेली दिसते. धोनी-विराट मैदानावर आमने सामने आल्यावर मॅचमध्ये काय नवीन रंगत येणार याची वाट प्रत्येक क्रिकेटप्रेमी पाहताना दिसतो. विराटसह आणखी एका क्रिकेटरची चर्चा रंगलीये ती म्हणजे मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माची. रोहितला कर्णधार पदावरून हकलल्या नंतर हार्दिक पांड्याला बऱ्याच प्रमाणात ट्रॉलिंगचं सामना करावा लागतोय .

सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Ipl 2024 fans tease to hardik pandya says chapri during Mumbai Indians match vs gt watch video see details

Video : “अरे छपरी”, लाईव्ह मॅचमध्येच हार्दिक पांड्याचा चाहत्यांकडून अपमान, जोरजोरात ओरडू लागले अन्…; पत्नीलाही बघवेना, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.