‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. एकामागोमाग एक मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांनी ही मालिका साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेतील कथानकाच्या जोरावर ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. मालिकेतील पात्रांच्या अभिनयाचेही चाहते आहेत. या मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. सायली व अर्जुन यांच्यातील सध्या बहरत जाणार प्रेम साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. (Tharal Tar Mag Promo)
मात्र सायली व अर्जुन यांची बहरत जाणारी ही प्रेमकहाणी खरीखुरी नाही, हे सत्य अद्याप सुभेदार कुटुंबापासून लपून आहे. सायली व अर्जुन यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असून ही गोष्ट दोघांव्यतिरिक्त फक्त चैतन्यला माहित आहे. दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही एकीकडे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र अद्याप दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. तर प्रेमात पडल्यानंतर दोघांना ते खोटं नवरा बायको असल्याचं नाटक करतात असं वाटतं.
https://www.instagram.com/reel/C6cutdnKhdN/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
तर चैतन्यने हे गुपित साक्षीला सांगितलेलं असतं. त्यामुळे साक्षीच्या हातात खूप मोठा पुरावा लागलेला असतो. साक्षी हे सत्य प्रियाला सांगते. आता मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये अर्जुन सायलीचं सत्य सुभेदार कुटुंबासमोर आलेलं पाहायला मिळतं आहे. प्रिया सुभेदारांच्या घरी येऊन पूर्णा आजीला सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगते. हे ऐकून पूर्णा आजी सायलीवर खूप चिडते आणि तिला हाताला धरून देवघरात घेऊन जाते. आणि सांगते, देवासमोर हात घेऊन शपथ घेऊन सांग की, तुझं आणि अर्जुनच लग्न झालं आहे का?.
सायलीसमोर खूप मोठा प्रश्न असतो. तर त्याचवेळी अर्जुन हे सर्व मागे उभं राहून पाहत असतो. सायली खोटं देवासमोर बोलणार नाही हा विश्वास सगळ्यांना असतो. अखेर सायली देवासमोर शपथ घेत सांगते की, हो माझं आणि अर्जुन सरांचं लग्न झालं आहे. आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे”. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. अखेर सायलीने अर्जुनच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. आता अर्जुन सायलीसमोर त्याचं प्रेम व्यक्त करणार का? हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.