कलाकार मंडळी आपल्या आगळ्यावेगळ्या लूकने किंवा अनोख्या कृतीने सोशल मीडियाद्वारे कायमच चाहत्यांचे, प्रेक्षकांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर ही कलाकार मंडळी आपल्या काहीना काही करत कायमच चर्चेत राहत असतात. अशातच बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही तिच्या एका कृतीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आपल्या अभिनयाने कायमच चर्चेत राहणारी ही अभिनेत्री तिच्या एका आगळ्या वेगळ्या कृतीने चर्चेत आली आहे.
काल अवघ्या देशभरात धूलिवंदनाचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडला. यात मराठीसह बॉलिवूड कलाकारांनी एकमेकांवर रंगांची उधळण करत धूळवड साजरी केली. यावेळी अभिनेत्री रवीना टंडन तिच्या कुटुंबाबरोबर धूलिवंदन साजरी करताना दिसली. यानंतर रवीना व तिची मुलगी राशा पापाराझींना शुभेच्छा देण्यासाठी आणि मिठाई वाटण्यासाठी त्यांच्या घरातून बाहेर पडल्या. यावेळी तिच्या चष्म्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
रवीनाच्या चष्म्याच्यावर एक अनोखी पिचकारी लावली होती. यावेळी तिने पिवळा रंगाचा फंकी चष्मा घातला होता. ज्याला पाणी फवारण्यासाठी पाईप जोडलेले होते. आणि या पाईपचा कंट्रोलर तिने हातात धरला होता. यावेळी पापाराझींना शुभेच्छा देताना ती त्यांच्यावर पाणी उडवतानाही दिसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनीदेखील भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
रवीनाच्या या व्हायरल व्हिडीओखाली “अंखियो से गोली मारे सत्यात उतरले, हे किती भारी आहे. रवीनाही आपल्या मुलीबरोबर लहान झाली आहे.” तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली रवीनाला होळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, रवीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर रवीनाने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अलीकडेच डिस्नी प्लस हॉटस्टारवरील ‘कर्मा कॉलिंग’ या सीरिजमध्ये दिसली होती. तसेच ती लवकरच ‘पटना शुक्ला’ या चित्रपटात दिसणार आहे.