भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा नेहमी चर्चेत असतो. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही त्याच्याबद्दल नेहमी चर्चा सुरु असते. काही महिन्यांपूर्वी तो पत्नी नताशा स्टॅनकोव्हीकपासून वेगळा झाला. त्याला एक मुलगा असून अनेकदा तो मुलाबरोबरदेखील दिसून येतो. मुलाबरोबरचेदेखील अनेक फोटो व व्हिडीओदेखील व्हायलर होताना दिसतात. अशातच आता नताशा भारतात परतली असून तिचे अनेक फोटो व व्हीडीओ व्हायरल होताना बघायला मिळतात. सध्या नताशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये नताशा दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर अलेक्सबरोबर दिसून येत आहे. तसेच तो नताशाला साडीदेखील नेसवताना दिसून येत आहे. (natasha stankovic viral video)
सध्या कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणतीही बॉलिवूड पार्टी, तसेच कुठेही फिरायला जाताना नताशा व अलेक्झांडर नेहमी एकत्रित असलेले दिसतात. नताशाने एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये अलेक्झांडर नताशाला साडी नेसवताना दिसत आहे. यामध्ये तो नताशाच्या गोल गोल फिरून साडी नेसवताना दिसत आहे. तसेच साडीच्या मागे तो सुई-दोऱ्याने शिलाई करतानादेखील दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ बघून आता नेटकऱ्यांना खूप राग आला आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “हार्दिकला जळवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे”. तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “हे सगळं हीने सोशल मीडियावर का टाकलं आहे, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “हार्दिकने याआधीच घटस्फोट द्यायला हवा होता. त्याचप्रमाणे अजून नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाला की, “ज्या लोकांना वाटतं की पैशाने सगळं काही विकत घेता येऊ शकतं त्यांच्यासाठी शांतता”.
दरम्यान अलेक्झांडर ‘गिरगीट’ या वेबसीरिजमध्ये दिसून आला होता. तसेच दिशा व टायगर श्रॉफ यांच्या ब्रेकअपनंतर तो दिशाबरोबरदेखील दिसून आला. तसेच आता नताशा व हार्दिक वेगळे झाल्यानंतर तो नताशाबरोबर फिरताना दिसत आहे. मात्र त्यांच्या नात्यावर नताशा व अलेक्झांडर यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही.