मराठीसह हिंदी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून घराघरांत व प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेल्या कलाकार म्हणजे अभिनेत्री नीना कुळकर्णी. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या नीना कुळकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही तितक्याच लोकप्रिय आहेत. नीना कुळकर्णी यांनी अनेकदा अनेक विषयांवर स्पष्टपणे आपली मतं व्यक्त केली आहेत. अशातच त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत मी स्त्रीत्व उत्तेजित पद्धतीने दाखवणाऱ्या दृश्यांच्या विरोधात असल्याचे भाष्य केलं आहे. (Neena Kulkarni On Titillation)
नीना कुळकर्णी यांनी नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. याबद्दल नीना यांनी असं म्हटलं की, “‘बादल’ नावाचा चित्रपट होता आणि त्यात जुगनी जुगनी नावाचा डान्स होता. जो आजही कधीकधी येतो तर मी डोळे मिटते. कारण मला त्यावेळी डान्स वगैरे शिकवलंच नव्हतं. कारण ज्या क्षेत्रात जायचं नाही तिथं गाणं, डान्सचा काही संबंधच नाही. तर त्यांनी मला सांगितलं की नीनाजी तुम्ही थोडं असं करा ना… यावर मी त्यांना नाही उत्तर दिलं. मी त्यांना म्हटलं की, मी दोन मुलांची आई आहे आणि मी हे असं करणार नाही आणि जरी आई नसते तरी मी हे केलं नसतं”.

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “माझ्या मते आपलं स्त्रीत्व वेगळ्या आणि उत्तेजित पद्धतीने दाखवण्याच्या मी विरुद्ध आहे. तेव्हाही होती. आधी मी मॉडलिंग करत होते त्यावेळीही होती आणि मला असं वाटतं आज तर मला तसं कुणी विचारणारच नाही. जरी विचारलं तरी मी एक थोबाडीत देईन. किंवा जर ते त्या भूमिकेला पूरक असेल तरच ते करायचं. नाही तर नाही करायचं आणि मी नाही केलं. मी नाही केलं याचाही त्याने आदर केला. पदर पडायचा नाही म्हटलं तर मी नाही पाडणार. तुम्हाला पटतं. यावर तो “ठीक आहे” म्हणाला. इतका चांगला माणूस होता तो”.
आणखी वाचा – ठाण्यातील वाहतूक कोंडीला वैतागली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “मुली वाचवा, मुली शिकवा आणि मुलीला…”
‘बायोस्कोप’ , ‘मोगरा फुलला’ , ‘बादल’, ‘नायक’, ‘हंगामा, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ अशा अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून नीना कुळकर्णी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘देवयानी’, ‘ये है मोहब्बतें’, ‘उंच माझा झोका’, अधुरी एक कहानी’ अशा मालिकांतूनही त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. दरम्यान, सध्या त्या स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.