कलाकार मंडळी ही सोशल मीडियावर काहीना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. कधी आपले फोटो-व्हिडीओ असोत किंवा कधी कामाबद्दलची माहिती असो. कलाकार मंडळी अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीवरही भाष्य करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी रोजच्या आयुष्यातील सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होत असतात. अशीच रोजच्या आयुष्यातील सर्वांच्या त्रासाची गोष्ट म्हणजे वाहतूक कोंडी. सध्या मुंबईसह इतर सर्व शहरात वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर आहे. या वाहतूक कोंडीचा सामना सामान्य जनतेसह कलाकारांनाही करावा लागतो. याच समस्येबद्दल अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. (Apurva Nemlekar On Thane Traffic)
अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर खूप ट्रॅफिक असल्याचे पाहायला मिळत आहे आणि या ट्रॅफिकला वैतागूनच तिने ही पोस्ट शेअर केली आहे. अपूर्वाने सध्या ठाण्यात राहत असून शूटिंगनिमित्त ती ठाणे ते मुंबई असा प्रवास करते. मात्र या प्रवसात तिला वाहतूक कोंडीचा सामना करवा लागतो आणि यंच वाहतूक कोंडीबद्दल अभिनेत्रीने मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रॅफिकचा फोटो शेअर करत “बेटी बचाओ, बेटी पढाओ और बेटी को ठाणे के ट्रॅफिकसे भी बचाओ” असं म्हटलं आहे.

याचाच अर्थ “मुली वाचवा, मुली शिकवा आणि मुलीला ठाण्याच्या ट्रॅफिकपासूनही वाचवा” असं म्हटलं आहे. तसंच यापुढे तिने हसण्याचा इमोजीही पोस्ट शेअर केला आहे. दरम्यान, अपूर्वाने याआधीही ट्रॅफिकबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी अभिनेत्रीने हवं तर टोल घ्या पण लेन्स (वाहनांची रांग) सुरु करा. सकाळी सात वाजता अशक्य ट्रॅफिक जाम, एक त्रस्त ठाणेकर!” असं म्हटलं होतं. त्यानंतर आता अपूर्वाने पुन्हा एकदा ट्रॅफिकबद्दल मार्मिक पोस्ट शेअर केली आहे.
अपूर्वा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने केलेल्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, अपूर्वा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, या मालिकेत अभिनेत्री सावनी ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे.